पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन वाफेचे मशीन, सॅनिटायझरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:18+5:302021-06-17T04:08:18+5:30
--- टाकळी हाजी : लाखेवाडी (मलठण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक कविवर्य दत्तात्रय जगताप यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शंभर ...
---
टाकळी हाजी : लाखेवाडी (मलठण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक कविवर्य दत्तात्रय जगताप यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शंभर विद्यार्थी दाखल करून घतेले व पहिलीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी जाऊन वाफेच्या मशीन, सॅनिटायझर, मास्क, वही उजळणी पुस्तक, पाटी, पेन्सिल, पेन व इतर शैक्षणिक साहित्य स्वखर्चाने देऊन सामाजिक कार्याचा वसा जपला आहे.
दत्तात्रय जगताप यांनी यापूर्वीही शालेय मुलांसाठी अनेक गोष्टींची मदत केली आहे व विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोड लागावी यासाठी विविध उपक्रम घेतले आहेत. याप्रसंगी केंद्रप्रमुख रामदास बोरूडे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणीताई नरवडे, मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप, उपशिक्षक शिवाजी भुजबळ, मुकुंद नरवडे, योगेश कदम, सतीश मावळे उपस्थित होते. जगताप यांच्या या उपक्रमाचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, विस्तार अधिकारी महादेव बाजारे, केंद्रप्रमुख रामदास बोरूडे यांनी अभिनंदन केले.
--
फोटो क्रमांक : १६ टाकळी हाजी प्रवेश प्रकिया
फोटो : लाखेवाडी (मलठण ) येथील शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी स्वखर्चाने शाळेतील मुलांना साहित्य वाटप करून केले नवगतांचे स्वागत