...अाणि त्यांनी थिअटरमध्ये कानाने बघितली कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:20 PM2018-05-19T20:20:10+5:302018-05-19T20:20:10+5:30
पुण्यातील पीव्हीअार अायकाॅन या मल्टिप्लेक्समध्ये पहिल्या वहिल्या अाॅडअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. थिअटरमध्ये केवळ कथा एेकण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी खूप वेगळा हाेता.
पुणे : अाॅडिअाे बुक ही संकल्पना तशी अापल्या सर्वांना नवी नाही. परंतु एका माेठ्या सिनेमागृहात प्रेक्षकांना एकत्र करुन केवळ एखादी कथा एेकवली तर...तुम्ही म्हणालं की प्रेक्षक सिनेमागृहात कथा केवळ एेकायला का येतील. स्नाेवेल तर्फे पुण्यातील पीव्हीअार अायकाॅन मल्टिप्लेक्समध्ये एका अाॅडिअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन केले हाेते. समाेर कुठलेही चित्र नसताना केवळ कथा एेकण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी विलक्षण हाेता. 75 मनिटांच्या कथेत प्रत्येक प्रेक्षकाने त्याच्या मनात तयार झालेली कथा समाेरच्या पडद्यावर पाहिली.
स्नाेवेल तर्फे पहिल्या अाॅडअाे प्रिमिअर शाेचे अायाेजन केले हाेते. यावेळी ती परत येईल ही कथा प्रेक्षकांना एेकवण्यात अाली. डॉ. गिरीश ओक यांचा प्रमुख आवाज या कथेत अाहे. या कथेचे लेखक आहेत शिरीष देखणे तर अंजली कुलकर्णी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्या अाॅडिअाे प्रिमिअरचा अनुभव पुणेकरांसाठी विलक्षण हाेता. या कथेमध्ये विविध अावाज व प्रसंगानुरुप साऊंड इफेक्ट करण्यात अाले हाेते. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेले या कथेचे कथानक अाहे. या शाे विषयी बाेलताना स्नाेवेलचे समिर धामणकर म्हणाले, जगातील काही देशांमधील सिनेमागृहांमध्ये विविध इफेक्ट्स वापरले जातात. खुर्चीच्या खालून येणारे अावाज, हालणारी खुर्ची असे विविध प्रकार तिकडे पाहायला मिळतात. त्यामुळे अापल्याकडील प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव द्यावा या हेतूने अाम्ही या प्रिमिअर शाेचे अायाेजन केले हाेते. त्याला प्रेक्षकांचा माेठा प्रतिसाद मिळाला.
अापण लहानपणीपासून एकत्र बसून कथा एेकत अालाे अाहाेत. अनेकदा अंगणात शेकाेटीला गाेलाकार बसून कथा वाचल्या जात असे. त्यामुळे अंधार करुन विविध साऊंड इफ्टेक्ट असलेली कथा प्रेक्षकांना एेकवली तर, या विचाराने अाम्ही हा शाे करण्याचे ठरविले. 75 मिनिटांच्या कथेत काेणीही बाहेर गेले नाही. प्रेक्षकांसाठी हा विलक्षण अनुभव हाेता. अनेकांनी फेसबुकवर याबाबत अापल्या प्रतिक्रीया सुद्धा मांडल्या अाहेत. असाच एक शाे अाम्ही मुंबईत सुद्धा करत अाहाेत. या अाॅडिअाे बुक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक नवे माध्यम तयार झाले अाहे. विविध लेखकांच्या कथांवर सध्या अाम्ही काम करत अाहाेत.