अाधी संवाद मग कारवाई ; वाहतूक पाेलिसांचे धाेरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 06:52 PM2018-11-20T18:52:44+5:302018-11-20T18:54:32+5:30
अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत.
पुणे : नववर्षापासून पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती केली जाणार अाहे. त्याला अनेक स्तरातून विराेध हाेत असताना हेल्मेट सक्तीवर पुण्याचे पाेलीस अायुक्त ठाम अाहेत. त्यातच अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. सर्व सरकारी कार्यालयांशी संपर्क व जनजागृती केल्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.
पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली जाणार अाहे. या अाधी पाचवेळा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात अाली हाेती. प्रत्येकवेळी पुणेकरांनी याला कडाडून विराेध केला अाहे. अाता पुण्याचे नवे पाेलीस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी येत्या एक जानेवारीपासून दुचाकीवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले अाहे. याला दुचाकी चालकांच्या अपघाताचे कारण पुढे केले अाहे. हेल्मेट न घालणाऱ्या नागरिकांवर एक जानेवारीपासून कारवाई केली जाणार असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांवर अाजपासूनच कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचे काम वाहतूक शाखेकडून करण्यात येत अाहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती केल्यानंतर कारवाई करण्यात येणार अाहे.
दरम्यान अाज हेल्मेट विराेधी कृती समितीची बैठक घेण्यात अाली असून या सक्तीला कुठल्या पद्धतीने विराेध करायचा याबाबत चर्चा करण्यात अाली. या बैठकीला या कृती समितीचे समन्वयक अंकुश काकडे, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर अादी उपस्थित हाेते.