आरटीई प्रवेश प्रक्रियेचा पहिलाच दिवस गोंधळाचा; अर्ज भरण्यात अनेक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:11 AM2018-02-11T05:11:52+5:302018-02-11T05:12:37+5:30

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रियेसाठी अर्ज शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस अत्यंत गोंधळाचा ठरला.

 The first day of the RTE admission process is confused; Many problems in filling up the application | आरटीई प्रवेश प्रक्रियेचा पहिलाच दिवस गोंधळाचा; अर्ज भरण्यात अनेक अडचणी

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा पहिलाच दिवस गोंधळाचा; अर्ज भरण्यात अनेक अडचणी

Next

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रियेसाठी अर्ज शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस अत्यंत गोंधळाचा ठरला. संकेतस्थळ लवकर न उघडणे, अजी अनुसूचित जातीचा कॉलमच उपलब्ध नसणे, उत्पन्न नमूद करण्यात अडचणी येणे आदी अडचणींचा पालकांना सामना करावा लागला.
आरटीई प्रवेशासाठी १० ते २८ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आरटीईच्या राखीव कोट्यांतर्गत राज्यभरात ९ हजार शाळांमधून १ लाख २५ हजार जागा उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. पहिली तसेच शिशू वर्गाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. आरटीई प्रवेशासाठी ३ ते ४ फेºया राबवाव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश मिळण्यास उशीर होऊ नये यासाठी जानेवारी महिन्यापासूनच ही प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र इंग्रजी शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नाव नोंदणी करण्यास विलंब केल्याने ती पुढे ढकलावी लागली.
या पार्श्वभूमीवर उशिराने आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असताना पहिल्याच दिवशी पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शनिवार व रविवार शासकीय सुटट्ीचा दिवस असल्याने या तक्रारींबाबत पालकांना दाद मागता आली नाही.
शिक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास पालकांना अडचणी आल्या. आॅनलाइन अर्जामध्ये धर्माची माहिती भरल्यानंतर जातीचा प्रवर्ग भरावा लागतो. त्यामध्ये अनुसूचित जाती (एससी) हा प्रवर्गच दिसून येत नव्हता. त्याचबरोबर उत्पन्नाची नोंद करण्यासाठी काही वेळेस कॉलमच दिसत नव्हता, त्यामुळे पालकांचे उत्पन्न अर्जात शून्य दाखविले जात होते. शनिवारी सुटट्ी असल्याने शासकीय कार्यालयांना सुटट्ी होती.

अडचणी दूर
करण्याचा प्रयत्न
आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरताना अनुसूचित जातीचा प्रवर्ग दिसत नसल्याच्या तसेच उत्पन्नाची नोंद करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी सकाळी प्राप्त झाल्या होत्या. आॅनलाइन प्रवेशाचे तांत्रिक काम पाहणाºया एनआयसीच्या अधिकाºयांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. रिफ्रेश केल्यानंतर एससी प्रवर्ग दिसू लागलेला आहे. त्याचबरोबर उत्पन्न नमूद करण्यासाठी आॅनलाइन व आॅफ लाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
- शरद गोसावी,
उपसंचालक, प्राथमिक विभाग

Web Title:  The first day of the RTE admission process is confused; Many problems in filling up the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे