जिल्ह्यात ५० लाख नागरिकांना पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:38+5:302021-08-18T04:15:38+5:30

आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेले रुग्ण, ४५ ते ५९ या वयोगटातील ...

First dose to 50 lakh citizens in the district | जिल्ह्यात ५० लाख नागरिकांना पहिला डोस

जिल्ह्यात ५० लाख नागरिकांना पहिला डोस

googlenewsNext

आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेले रुग्ण, ४५ ते ५९ या वयोगटातील सर्व नागरिक, १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशा सर्वांचे लसीकरण जानेवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे १,१७,४८,६३६ इतकी आहे. यामध्ये १८ वर्षांवरील ८५,३९,७०६ नागरिकांचा समावेश आहे. दररोज ५०,००० नागरिकांचे लसीकरण केल्यास उर्वरित ३५ लाख नागरिकांना पहिला डोस मिळण्यास दोन ते अडीच महिने लागू शकतात.

जिल्ह्यात आजवर ७९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ५९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पहिला डोस, तर ६३ टक्के कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस झाला आहे. ७४ टक्के ज्येष्ठ नागरिकांना पहिला, तर ४७ टक्के ज्येष्ठांना दुसरा डोस मिळाला आहे. ४५-५९ या वयोगटातील ६२ टक्के नागरिकांना पहिला, ३७ टक्के नागरिकांना दुसरा डोस घेऊन झाला आहे. १८-४४ या वयोगटातील ५० टक्के नागरिकांना पहिला, तर ३ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.

-----------------

गेल्या सात दिवसांमधील लसीकरण :

१६ आॅगस्ट - ८३,५७५

१५ आॅगस्ट - ३३,८२८

१४ आॅगस्ट - १,००,८३५

१३ आॅगस्ट - ९३,२८९

१२ आॅगस्ट - २२,५००

११ आॅगस्ट - २०,६०२

१० आॅगस्ट - २८,३७६

------------------------

एकूण लसीकरण :

अपेक्षित लाभार्थी पहिला डोस दुसरा डोस

पुणे ग्रामीण ३६,०२,६२४ १७,५४,४५६ ७,४९,९५१

पुणे मनपा ३०,००,९२७ २३,०६,०४९ ७,२४,०६४

पिं.चिं. १९,३६,१५४ ९,३४,३३२ ३,११,३३२

------------------------------------------------------------------

एकूण ८५,३९,७०६ ४९,९४,८३७ १७,८५,३४७

Web Title: First dose to 50 lakh citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.