प्रथम स्वतःच्या कामाची माहिती घ्या नंतरच निधी मागा - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:48+5:302021-01-08T04:34:48+5:30

पुणे : आंबिल ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घालून कित्येक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटनेला आज दोन वर्षे उलटली आहेत. ...

First find out about your own work then ask for funds - Deshmukh | प्रथम स्वतःच्या कामाची माहिती घ्या नंतरच निधी मागा - देशमुख

प्रथम स्वतःच्या कामाची माहिती घ्या नंतरच निधी मागा - देशमुख

Next

पुणे : आंबिल ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घालून कित्येक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटनेला आज दोन वर्षे उलटली आहेत. या घटनेच्यावेळी महापालिकेसह राज्यातही सत्तेवर असताना आपण काय केले ते आधी भाजपने सांगावे व नंतरच संरक्षण भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव द्यावा़, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केली आहे़

महापालिकेने संरक्षण भिंतीसाठी पाच महिन्यांपूर्वी निविदा काढूनही ठेकेदाराने ते काम केले नाही. या गळतीसाठी पालिकेत निधीची गळती कशी झाली याची प्रथम माहिती घेणे महत्वाचे असल्याचेही देशमुख म्हणाले़

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुरामुळे पडलेल्या संरक्षक भिंतींच्या कामासाठी राज्य शासनाकडे ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पूर येऊन दोन वर्षे उलटली, त्या काळात भाजपाचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

संरक्षक भिंतीकरिता महापालिकेने प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. त्यांनी २८१ कोटी रुपयांचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे स्थायी समितीने ७७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबविली होती. मात्र, ही कामे झालीच नाही. त्यावेळी कोरोनाचे संकटही नव्हते. त्यामुळे त्यामागे लपायलाही भाजपाला जागा नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यावर आता महापालिका राज्य शासनाकडे निधीची मागणी करून आपली जबादारी झटकत असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे

------------------------------

Web Title: First find out about your own work then ask for funds - Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.