स्वदेशी इंधनावर पुण्यातून मुंबईकडे झेपावले पहिले विमान; SAF ग्रीन फ्युएलचा वापर

By नितीश गोवंडे | Published: May 20, 2023 06:11 PM2023-05-20T18:11:41+5:302023-05-20T18:12:43+5:30

इंडीयन ऑईल आणि प्राज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला...

First flight from Pune to Mumbai on indigenous fuel; Use of SAF Green Fuel | स्वदेशी इंधनावर पुण्यातून मुंबईकडे झेपावले पहिले विमान; SAF ग्रीन फ्युएलचा वापर

स्वदेशी इंधनावर पुण्यातून मुंबईकडे झेपावले पहिले विमान; SAF ग्रीन फ्युएलचा वापर

googlenewsNext

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या विमानातील स्वदेशी इंधनाचा प्रयोग शुक्रवारी यशस्वी झाला. पुणे विमानतळावरून स्वदेशी इंधनावर उडणारे पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

इंडीयन ऑईल आणि प्राज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला. पहिले व्यावसायिक विमानाचे उड्डाण यशस्वी झाले. यावेळी एअर एशिया आणि एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, इंडीयन ऑईलचे अध्यक्ष वैद्य व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

स्वदेशात उत्पादित केलेले एसएएफ (सस्टेनेबल अ`व्हिएशन फ्युएल) हे इंधन वापरून हवाई उड्डाण हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. उर्जा स्वातंत्र्य आणि हरित क्रांतीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. आता आकाश कार्बन मुक्त होईल.
- डॉ. प्रमोद चौधरी, संस्थापक अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज

एअर एशिया-इंडिया, इंडीयन ऑईल आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या एकत्रित प्रयत्नाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला. याचा आम्हाला खूप आनंद आहे. पर्यावरणातील कार्बनचा प्रभाव कमी करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.
- अलोक सिंग, व्यवस्थापकीय संचालक, एअर एशिया-इंडिया

Web Title: First flight from Pune to Mumbai on indigenous fuel; Use of SAF Green Fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.