पहिल्या अश्वरिंगणाने पारणे फेडले
By admin | Published: June 25, 2017 04:30 AM2017-06-25T04:30:09+5:302017-06-25T04:30:09+5:30
येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठू नामाचा गजर करत सोपानकाका पालखी सोहळयातील पहिले अश्वरिंगण पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठू नामाचा गजर करत सोपानकाका पालखी सोहळयातील पहिले अश्वरिंगण पार पडले. ‘सोपानकाका चरणी, ‘अश्व धावताच रिंगणी’ हजारो भाविकांच्या उपस्थीत पालखीतील पहील्या अश्व रिंगणाने उपस्थितींच्या डोळयांचे पारणे फेडले.
काल रात्रीचा निंबुतचा मुक्काम उरकून हा सोहळा सोेमेश्वरनगरच्या दिशेने रात्रीच्या मुक्कामासाठी झेपावला. सकाळी आठ वाजता निंबुत छप्री येथे हा सोहळा सकाळच्या चहा पानासाठी विसावला. याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, पुणे जिल्हा कृषी संघाचे माजी उपाध्यक्ष गौतम काकडे, तानाजी काकडे, शिवाजी लकडे, सतिश दगडे, शिवाजी दगडे, आप्पासो काळे यांनी पालखीचे स्वागत केले.
दीड तासाच्या विसाव्यानंतर हा सोहळा सकाळी अकरा वाजता दुपारच्या न्याहरीसाठी वाघळवाडी येथे विसावला. या ठिकाणी सरपंच राजेंद्र काश्वेद, उपसरपंच विजय गायकवाड, माजी उपसरपंच गणेश जाधव, महादेव सावंत, विठ्ठल गायकवाड, माजी सरपंच सतिश सकुंडे, आनंदराव सावंत, कल्याण तुळसे, प्रविण सकुंडे, किरण गायकवाड, किसन सकुंडे, हेमंत गायकवाड, ग्रामसेवक डि. टी. होळकर आदी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
या वेळी पंचायत समिती सदस्या निता फरांदे, मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, महेश काकडे, लालासाहेब माळशिकारे, लक्ष्मण गोफणे, शांताराम कापरे, मोहन जगताप, अॅड, महेश राणे, बाळासाहेब गायकवाड, शेखर खंडागळे, कार्यकारी संचालक सुरेश तावरे, विक्रम भोसले, डॉ. मनोज खोमणे, राजू धुर्वे, आदी उपस्थीत होते.
पालखीबरोबर विश्वस्त गोपाळ महाराज गोसावी, पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत महाराज गोसावी, गजानन महाराज गोसावी, चोपदार मनोज रणवरे व हरीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रींगणाचा सोहळा पार पडला. दरवर्षीप्रमाणे राजश्री जुन्नरकर हीने संपुर्ण रिंगणाला रांगोळी काढली होती. त्यांनतर सायंकाळी सहा वाजता पालखी मुक्कामासाठी कारखान्याच्या छत्रपती मैदानावर विसावली. सोमेश्वर आणि बारामती मेडीकल असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना २० हजार रूपयांच्या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेखर कदम, शेखर जगताप, सचिन कारंडे, प्रविण कोंडे, धनंजय चव्हाण, सचिन सोरटे आदी उपस्थीत होते. कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.