Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 12:10 PM2024-07-08T12:10:58+5:302024-07-08T12:12:39+5:30

टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साहाने रिंगण पार पडला

First horse ringan staged in Belwadi A crowd of varakri in sant tukaram maharaj palkhi in ashadhi wari | Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

लासुर्णे : देहभान विसरवणारा, सावळ्या विठूच्या चरणी लीन करणारा, शीण घालविणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साहाने रिंगण सोहळ्याची भव्यता उत्तरोत्तर वाढविली. जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील  (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे सोमवारी  (दि. 08) मोठ्या उत्साहात पार पडले.

नाम तुकोबाचे घेता

डोले पताका डौलात

अश्व धावता रिंगणी

नाचे विठू काळजात

अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना,

असा रंगला रिंगण सोहळा

अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर, टाळकरी, पोलिस, होमगार्ड, विणेकरी, तुळसी वृंदावनधारक महिला, झेंडेकांचे रिंगण पार पडले. रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावला होता.'रामकृष्ण हरीचा जयघोष' करताना वारकरी गहिंवरले होते. (Ashadhi Wari)

सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर, टाळकरी, पोलिस, होमगार्ड, , तुळसी वृंदावनधारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावला. तत्पूर्वी तहसीलदार श्रीकांत पाटील, सोहळा प्रमुख संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख हभप भानुदास महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप अभिजीत महाराज मोरे, कांतीलाल जामदार, सर्जेराव जामदार सरपंच मयुरी शरद जामदार, उपसरपंच नामदेव इतापे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अड. शरद जामदार, शहाजी शिंदे, पंकज जामदार,  अॅड. शुभम निंबाळकर, पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे,  आदींनी पालखी रथाचे स्वागत केले.

Web Title: First horse ringan staged in Belwadi A crowd of varakri in sant tukaram maharaj palkhi in ashadhi wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.