महापालिका जिंकण्यासाठीच ‘राष्ट्रवादी’चा पहिला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:03+5:302021-07-01T04:10:03+5:30

राजू इनामदार पुणे : महापालिकेतील गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर भोवतालच्या गावांचा समावेश महापालिकेत करून घेतला ...

The first innings of the NCP to win the Municipal Corporation | महापालिका जिंकण्यासाठीच ‘राष्ट्रवादी’चा पहिला डाव

महापालिका जिंकण्यासाठीच ‘राष्ट्रवादी’चा पहिला डाव

Next

राजू इनामदार

पुणे : महापालिकेतील गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर भोवतालच्या गावांचा समावेश महापालिकेत करून घेतला आहे. आधीची ११ व आता नव्याने समाविष्ट झालेली २३ अशा ३४ गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय वर्चस्व पाहता हीच एक बाब प्रामुख्याने दिसते आहे.

महापालिका क्षेत्र निश्चित करण्याच्या नियमाप्रमाणे महापालिकेसाठी ३० लाख लोकसंख्येला १६० नगरसेवक व त्यापुढील प्रत्येक १ लाख लोकसंख्येला १ नगरसेवक मिळतो. यानुसार समाविष्ट ३४ गावांमुळे लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्येतील वाढ फार तर ५ लाख असेल. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत फार वाढ होणार नाही. आधीच्या ११ गावांना मिळून फक्त दोन नगरसेवक मिळाले यावरून ते स्पष्ट होते.

मात्र आता समाविष्ट गावांमुळे प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे. त्यात ही गावे त्यांच्या लगतच्या प्रभागांमध्ये मिसळून जातील. त्याशिवाय आता चारचा प्रभाग नसून १ प्रभाग १ नगरसेवक अशी रचना असेल असे सांगितले जाते. त्यातून मतदानावर निश्चितपणे फरक पडणार आहे. त्याच विचारांमधून राजकीय फायदा देणारा हा निर्णय त्वरित घेण्यात आला असल्याची चर्चा आहे.

या आधीच्या फडणवीस सरकारकडून याच कारणाने हा निर्णय लांबणीवर टाकला जात होता. मात्र भाजपा वगळता काँग्रेससह अन्य पक्षीयांच्या हवेली तालुका कृती समितीने न्यायालयात दावा दाखल केला. निकालात सरकारला गावांना समाविष्ट करून घेण्याचा आदेश देण्यात आला. तरीही त्यांनी अकराच गावे घेतली होती. आता राज्यात सत्ता आल्यावर राष्ट्रवादीने लगेचच सर्व गावे सामील करून घेतली आहेत.

Web Title: The first innings of the NCP to win the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.