पहिल्या टप्प्यात १२५ बस ‘बीआरटी फ्रेंडली’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:05 AM2018-08-22T03:05:06+5:302018-08-22T03:05:56+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पाच-सहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील ई-बससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

In the first phase 125 bus 'BRT friendly' | पहिल्या टप्प्यात १२५ बस ‘बीआरटी फ्रेंडली’

पहिल्या टप्प्यात १२५ बस ‘बीआरटी फ्रेंडली’

Next

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पाच-सहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील ई-बससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे. या टप्प्यात एकूण १५० बस घेतल्या जाणार असून, त्यापैकी १२५ बस बीआरटी फे्रंडली असतील. या बस प्राधान्याने बीआरटी मार्गांवरच सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
‘पीएमपी’ संचालक मंडळाने ५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बस तीन टप्प्यांमध्ये पीपीपी तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १५० बस घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठीची निविदा दि. २५ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी शक्यता आहे. निविदा भरण्याची प्रक्रिया २१ दिवस सुरू राहील.
संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात १२५ बस बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गांसाठी पूरक असणाऱ्या घेतल्या जातील. तर २५ बस इतर मार्गांसाठी असतील. १२५ पैकी बहुतेक बस बीआरटी मार्गांवरच चालविण्याचे नियोजन आहे. बीआरटी मार्गासाठीच्या बस १२ मीटर लांबीच्या तर इतर बस ९ मीटर लांबीच्या असतील. यामध्ये सध्याच्या बसपेक्षा आसन क्षमता जास्त
असेल, असे अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, बीआरटी मार्गासाठी सुमारे एक हजार बसची गरज आहे. मात्र, सध्या केवळ ७५७ बस उपलब्ध असल्याने या मार्गांवर अपेक्षित बस पुरविता येत नाहीत. पण पहिल्या टप्प्यातील ई-बस प्रत्यक्ष मार्गावर येण्यासाठी जानेवारी महिना उजाडावा लागणार आहे.

Web Title: In the first phase 125 bus 'BRT friendly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.