देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 02:33 PM2021-07-11T14:33:27+5:302021-07-11T14:34:38+5:30

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हे प्रतिकात्मक रिंगण

The first round arena ceremony was held in the premises of Dehut temple at the behest of Znanoba-Tukaram | देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा

देहूत मंदिराच्या आवारात ज्ञानोबा - तुकारामांच्या गजरात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा

Next
ठळक मुद्देदरवर्षी बेलवंडी येथे अश्वासह वारीतील विणेकरी, पताका, तुळस, टाळ व मृदंग घेऊन सहभागी होणारे वारकरी गोल रिंगण करतात

देहूगाव: श्री संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पायीवारी पालखी सोहळ्यातील वाटचालीतील अश्वासह पहिले गोल रिंगण जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात श्री  क्षेत्र देहूगाव येथे पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी उपस्थित असलेल्य वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

पहाटे चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिरात काकडाआरती झाली. सकाळी अकरा वाजता मंदिरातील भजनी मंडळात भजनाला सुरवात झाली. त्यानंतर  पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणेसाठी बाहेर घेण्यात आली. यावेळी तुतारी वाजताच उपस्थित सेवेकऱ्यांनी गरुड टक्के, अब्दागिरी, पताका व जरी पटका घेत आप आपल्या सेवेला सुरवात केली. त्यानंतर पालखी खांद्यावर घेत मंदिराच्या आवारात आणली.

दरम्यानच्या काळात चोपदार यांच्या वारीतील दंडाच्या इशारा झाला आणि उपस्थितांनी भजन करीत पावले खेळण्यास सुरवात केली.  दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पावले खेळण्याचे झाल्यानंतर वारीतील वाटचाली प्रमाणे उपस्थित वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. मधोमध पालखी ठेवण्यात आली. तेथे काही काळ भजन करीत पावले फुगड्यांचाही डाव रंगात आलेला असताना खेळ खेळत गोल रिंगणाला सुरवात झाली.

सर्व उपस्थित वीणेकरी, पकवाज वादक, वारकरी संप्रदयाची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी भगिनी मंदिराच्या आवारात रिंगणात धाव घेतली. त्यानंतर रिंगणात पाढरा शुभ्र अश्व रिंगणात आणला. घोडेस्वाराच्या खांद्यावर भगवी पताका घेऊन अश्व रिंगणात सोडण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करीत आनंद व्यक्त केला. 

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांमुळे पायीवारी न होता प्रतिकात्मक वारी आणि गोल रिंगण 

दरवर्षी वारीतील वाटचालीमध्ये पालखी सणसर मुक्कामवरून पुढे पहाटे सहाच्या सुमारास पुढील वाटचालीसाठी निघते. सकाळची न्ह्याहारी झाल्यानंतर पालखी बेलवंडी येथे येते. तेथे अश्वासह वारीतील विणेकरी, पताका, तुळस, टाळ व मृदंग घेऊन सहभागी होणारे वारकरी यांनी बेलवंडी येथे गोल रिंगण करतात. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांमुळे पायीवारी न होता प्रतिकात्मक वारी होत आहे. त्यामुळे १ जुलैच्या पालखी प्रस्थानानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका येथील भजनी मंडपात ठेवून नित्योप्रक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे वारीच्या वाटचालीतील प्रतिकात्मक अश्वसह पहिले गोल रिंगण पार पडले.      

Web Title: The first round arena ceremony was held in the premises of Dehut temple at the behest of Znanoba-Tukaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.