ओतूरमध्ये शाळेची पहिली घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:23+5:302021-07-20T04:08:23+5:30
शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर सर्व वर्ग कर्मचाऱ्यांच्या मदतीने सॅनिटायझरने फवारण्यात येतात. विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यापूर्वी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे तापमान ...
शाळा भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर सर्व वर्ग कर्मचाऱ्यांच्या मदतीने सॅनिटायझरने फवारण्यात येतात. विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यापूर्वी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी पल्स ऑक्सिमीटर व थर्मल गनच्या सहाय्याने मोजली व त्याची नोंद ठेवली. प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक यांना माक्सचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
विद्यालयात ८ वी ते १o वी ७९५ विद्यार्थी आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गट दिवसाआड म्हणजे आठवड्यातून तीनच दिवस शाळेत येणार आहे. सकाळी १०ते १ पर्यंत सहा तासिका होणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी असणार नाही. शाळेत येताना स्वत:ची पाण्याची बाटली, सॅनिटायझर बॉटल व शालेय दफ्तर घेऊन येण्यास परवानगी आहे.
आज शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला.
--
मुख्याध्यापक अधिकाऱ्यांच्या बैठकीत शाळा सुरू करण्यावर एकमत
विद्यालय सुरू करण्यापूर्वी गावातील तीन शाळांचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, बसिर शेख व माने सर, ओतूरचे सरपंच गीता पानसरे, आरोग्य अधिकारी डॉ. सारोक्ते, कामगार तलाठी राहुल पंधारे, ग्रामसेवक प्रदीप खिलारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पंचायत समिती जुन्नरचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, संस्थाप्रमुख अनिल तांबे, वैभव तांबे, नितीन पाटील यांची सहविचार सभा झाली. सर्वांनी विद्यालय सुरू करण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर इयत्तावर पालकांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. पालकांनीसुद्धा एकमुखाने मान्यता दिली.
--
१९ ओतूर शाळेची पहिली घंटा वाजली
सोबत फोटो - विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देऊन त्यांची ऑक्सिजन पातळी व तापमान तपासताना शिक्षक.