भारतात इंग्रजी सत्तेला पहिला हादरा राजे उमाजी नाईक यांनी दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:18+5:302021-09-08T04:14:18+5:30

भिवरी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त मानवंदना दत्तात्रय काळे : भिवरी येथील नाईक यांची जयंती ...

The first shock to English power in India was given by King Umaji Naik | भारतात इंग्रजी सत्तेला पहिला हादरा राजे उमाजी नाईक यांनी दिला

भारतात इंग्रजी सत्तेला पहिला हादरा राजे उमाजी नाईक यांनी दिला

Next

भिवरी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त मानवंदना

दत्तात्रय काळे : भिवरी येथील नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

गराडे : भारतात इंग्रजी सत्तेला पहिला हादरा राजे उमाजी नाईक यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन साथीधारांच्या सहकार्याने स्वातंत्र्याचा लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, असे प्रतिपादन पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे यांनी केले.

भिवरी (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ मंदिरात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजिला होता. त्या वेळी काळे यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी ग्रामस्थांनी नाईक यांना मानवंदना दिली. या वेळी सरपंच संजय कटके, उपसरपंच कौशल्या दळवी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कटके, संदीप कटके, पोपट कटके, माऊली दळवी, भाऊसाहेब दळवी, नाथाभाऊ कटके, भिकाजी कटके, रमेश कटके, बाळासाहेब कटके, दत्तात्रय ताम्हणे, सोपान गोफणे, सुनील गोफणे, शिवाजी घाटे, पांडुरंग कटके, बाळासाहेब नाटकर, अशोक जगदाळे, विठ्ठल कटके, सचिन दळवी, कटके, श्रीकांत येळवंडे, सुनील ढवळे, रामदास कटके, मार्तंड दळवी, अमोल फडतरे, नवनाथ भिसे ग्रामसेवक सोमनाथ नवले, तलाठी गणपत खोत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रास्ताविक सचिन दळवी यांनी केले सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. आभार सुनील गोफणे यांनी मानले.

-फोटो क्रमांक : ०७ भिवरी उमाजी नाईक अभिवादन

फोटोओळी : उमाजी नाईक यांच्या मानवंदना कार्यक्रमात सरपंच संजय कटके, दत्तात्रय काळे, पोपट कटके, भाऊसाहेब दळवी आदी.

Web Title: The first shock to English power in India was given by King Umaji Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.