भुकूूम मठात प्रथमच माघ शुद्ध दशमी साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:14+5:302021-02-24T04:11:14+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५२ वर्षांनंतर प्रथमच हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. संत गणोरेबाबांनी १९६८ पासून ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५२ वर्षांनंतर प्रथमच हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला आहे.
संत गणोरेबाबांनी १९६८ पासून सुरू केलेल्या माघ शुद्ध दशमी उत्सवाचे यंदा ५३ वे वर्ष होते. दरवषी एक सप्ताह चालणारा हा उत्सव या वर्षी कोरोनामुळे रद्द करून केवळ एक दिवसच मठामध्ये माघ शुद्ध दशमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हभप गणेश महाराज कार्ले यांच्या काल्याचे कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ हगवणे, शिवसेनेचे नेते नाना शिंदे, नामदेव माझिरे, विजय माझिरे, संत गणोरेबाबा मठाचे विश्वस्त एकनाथ हगवणे, निनाद मुळे आदी उपस्थित होते.
माघ शुद्ध दशमीच्या दिनी संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत गणोरेबाबा यांना अनुगृह मिळाला होता. या निमित्ताने झालेल्या उत्सवाचा प्रारंभ संत गणोरेबाबांच्या महाभिषेकाने झाला. त्यानंतर काढण्यात आलेल्या पादुका पालखी मिरवणुकीत भूगाव, भुकूम, पिरंगुटसह राज्यातून आलेले भाविकवर्ग सहभागी झाला होता. यावेळी भजनांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
२३ पिरंगुट