देशात प्रथमच शहिदांचे महाश्रद्ध
By Admin | Published: September 21, 2014 02:13 AM2014-09-21T02:13:21+5:302014-09-21T02:13:21+5:30
देशासाठी शहीद झालेल्या युवा क्रांतीकारकांचा देह त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकला नाही. भूमातेच्या कुशीत हे शहिद सामावून गेले.
पुणो : देशासाठी शहीद झालेल्या युवा क्रांतीकारकांचा देह त्यांच्या नातेवाईकांना मिळू शकला नाही. भूमातेच्या कुशीत हे शहिद सामावून गेले. त्यामुळे त्यांची आठवण ठेवत या युवा क्रांतीकारकांचे महाश्रध्द आणि तर्पण यज्ञ करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील 12क् नद्यांचे पाणी आणि शहिदांचे रक्त सांडलेल्या 32 ठिकाणांची माती संकलित करण्यात आली आहे. हे कलश शनिवारी पुण्यात आणण्यात आणण्यात आले आहेत.
अखिल भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी समिती आणि आझाद हिंद मंच यांच्या वतीने दिल्ली येथे 23 सप्टेंबर रोजी महाश्रध्दाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक क्रांतीकारकांचे वंशज उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे सरचिटणीस आबासाहेब राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले, देशासाठी रक्त सांडलेल्या क्रांतीकारकांना व्यापारी, लेखक, कवी, डॉक्टर असा कोणताही व्यवसाय पत्करून चांगले
आयुष्य जगता आले असते. परंतु त्यांनी उमेदीच्या काळात बलिदान देऊन आपल्यासाठी आणि देशासाठी खूप मोठे कार्य केले आहे. स्वातंत्र्यासाठी लढा देत मृत्यू पत्करल्यानंतर अनेकांचे अंत्यसंस्कारदेखील होऊ शकले नाहीत. या हजारो शहिदांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम देशात पहिल्यांदाच होणार आहे.
शहिदांचे रक्त सांडलेल्या अंदमान, जालियनवाला बाग,
झाशी किल्ला, पंजाब स्मारक, कर्नाटक, औरंगाबाद, बेळगाव,
येरवडा कारागृह, मुंबई, नाशिक, ठाणो, वसई बाजार यांसारख्या 32 ठिकाणांहून माती गोळा करण्यात आली आहे.
तसेच अलाहाबाद, केरळ, रामेश्वर, आळंदी, द्वारका, गंगासागर, कुरूक्षेत्र, कोल्हापूर, हिमालय, महाबळेश्वर, बद्रीनाथ यांसह
श्रीलंका अशा 121 ठिकाणच्या नद्यांचे पाणी एकत्रित करण्यात आले
आहेत. त्यासाठी एन. आर.
माथाड आणि मधुकर आडेलकर यांनी पुढाकार घेतला आहे, असे राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)