पहिल्यांदाच स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार महिला पोलीस अधिकाऱ्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:10+5:302021-08-21T04:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपावण्यात आला आहे.
पुणे लोहमार्ग जिल्ह्यामध्ये एकूण ६ पोलीस ठाणे, १६८ रेल्वे स्टेशन, २३५ प्लॅटफार्म, १३ दूरक्षेत्रे, ६ उपदूर क्षेत्रे आणि ४ मदत केंद्र आहेत. यात सुरू असलेले अवैध धंदे, मोबाईल, लॅपटॉप, मंगळसूत्र, पाकीटचोऱ्या, तसेच जबरी चोऱ्या, दरोडे यांच्यावरती पूर्ण वचक ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयापैकीच एक हा निर्णय आहे. पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या २००६ बँचच्या पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे, पुणे, नवी मुंबई, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली, पुणे ग्रामीण, मुंबई रेल्वे अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामकाज केले आहे. पोलीस खात्यात त्या जवळपास १६ वर्षे कार्यरत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी त्या खंबीरपणे पेलतील, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.
-----------------------------------------------