वरवंड येथे प्रथमच पदवी प्रदान कार्यक्रम
By admin | Published: April 26, 2016 01:59 AM2016-04-26T01:59:29+5:302016-04-26T01:59:29+5:30
वरवंड ग्रामशिक्षण संस्था असून या संस्थेचा स्थापनेपासून कधीही अशा प्रकारे कार्यक्रम केला गेला नव्हता.
वरवंड : दौंड तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर असणारे गाव म्हणजे वरवंड. या गावामध्ये वरवंड ग्रामशिक्षण संस्था असून या संस्थेचा स्थापनेपासून कधीही अशा प्रकारे कार्यक्रम केला गेला नव्हता. मात्र ही पदवी प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे येथील विद्यार्थी व शिक्षकवर्ग व संस्थेचे अध्यक्ष, संचालक यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड (ता. दौंड) यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रदान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ३८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून टी. सी. कॉलेज प्राचार्य बारामती डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. अर्जुन दिवेकर, विकास ताकवणे, प्राचार्य एल. के. शितोळे, डॉ. विजय दिवेकर, योगिनी दिवेकर, संजय दिवेकर, प्राचार्य के. डी. वणवे, मुख्याध्यापक अनिल शितोळे, संतोष कचरे, संस्थेचे संचालक गणपत दिवेकर व अंकुश दिवेकर उपस्थित होते. प्रा. डॉ. के. व्ही. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मारुती वाघमारे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)