पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या शोभायात्रेत वीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच खंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:42 PM2020-03-25T19:42:37+5:302020-03-25T19:42:58+5:30
गेल्या काही वर्षांत गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे एक समीकरण
पुणे : हिंदू नववषार्चे स्वागत करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहरातील सर्व शाखांच्या वतीने उत्सव साजरा करण्याबरोबरच मंगलमयी वातावरणात शोभायात्रा काढण्यात येते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या शोभायात्रेमध्ये प्रथमच खंड पडला. बुधवारी( 25 मार्च) शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात न आल्यामुळे शाखा सदस्यांना आजच्या दिवशी याची प्रकषार्ने उणीव जाणवली.
गेल्या काही वर्षांत गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे एक समीकरण झाले आहे. .मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे गर्दी टाळण्यासाठी संघाच्या शाखांनी शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्याला ढोल लेझीमचा निनाद, पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी होणा?्या महिला, सामाजिक संदेश देणारे देखावे या माध्यमातून घडणारे शोभायात्रेचे दर्शन पुणेकरांना अनुभवता आले नाही.याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर प्रचारक सुनील साठे ' लोकमत' शी बोलताना म्हणाले, पुण्यात वीस वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी पहिल्यांदा कोथरूड मध्ये शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्यानी विविध उपनगरांमध्ये हा उपक्रम सुरू झाला. गेल्या वर्षी शहराच्या 35 विविध भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. विविध पंथ, संप्रदाय, सामाजिक संस्था यांनी एकत्र यावे विशेषत: तरुण वर्ग जो 31 डिसेंबर च्या दिवशी पार्ट्या करण्यात रमतो त्याऐवजी आपल्या हिंदू संस्कृतीचे त्यांना महत्व कळावे हा त्यामागचा उद्देश आहे. यात कोणी कुठलाही बॅनर घ्यायचा नाही. विविध चित्ररथ, विविध संदेश देणारे फलक घेऊन ही शोभायात्रा काढली जाते. फेब्रुवारी मध्ये शोभायात्रेच्या तयारीसाठी बैठका झाल्या होत्या.पण 16 मार्च ला कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये सगळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. पूर्वी 31 मार्चपर्यंत ची मुदत होती त्यामुळे रामनवमी वगैरेला ही शोभायात्रा काढता आली असती पण आता संचारबंदी 21 दिवसांसाठी लागू झाली आहे.. त्यामुळे आता काढणे शक्य नाही. याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार यांचा गुढीपाडव्याला तिथीने जन्मदिवस असतो त्यांना प्रणाम करण्यासाठी 1926 पासून शाखांतर्फे उत्सव साजरा केला जातो. यादिवशी सरसंघचालक प्रणाम चा कार्यक्रम होतो..मात्र हा उत्सवही यंदा झाला नाही.
.......
' कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी दरवर्षी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते गुढीचे पूजन केले जाते..मग डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात येते. त्यात अनेक जण सहभागी होतात..यात लेझीम, सामाजिक संदेश देणारी पथके समाविष्ट असतात..जिवंत देखावे तसेच पारंपारिक वेशभूषेत महिला सहभागी होतात..घरी घाईत गुढी उभारून आम्ही 7 वाजता शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जातो..पण यंदा ती शोभायात्रा निघाली नाही. आज त्या मंगलमयी वातावरणाची आम्हाला खूपच उणीव भासली- मेधा कुलकर्णी, माजी आमदार