माळेगाव पोलीस दूरक्षेत्रात प्रथमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:36+5:302021-08-27T04:14:36+5:30
माळेगाव : येथील पोलीस दूरक्षेत्रात प्रथमच एका महिला पोलीस कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पदभार स्वीकारणा-या ...
माळेगाव : येथील पोलीस दूरक्षेत्रात प्रथमच एका महिला पोलीस कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पदभार स्वीकारणा-या पोलिसांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत माळेगाव पोलीस दूरक्षेत्र आहे. या दूरक्षेत्रात सहा गावांचा सहभाग आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले जाते. बारामतीचे उपनगर म्हणून माळेगाव उदयास येत आहे. याच पार्श्वभूमीवर संवेदनशील असलेले गावात प्रथमच महिला पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. माळेगाव पोलीस चौकी अंतर्गत माळेगाव, माळेगाव खुर्द, खांडज, शिरवली, सांगवी, पाहुणेवाडी या गावांचा समावेश आहे, साधारणपणे दीड लाख लोकसंख्या या चौकीच्या अंतर्गत येते. प्रथमच पोलीस नाईक सुप्रिया बनसोडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचा-यांचा सत्कार कार्यक्रमास विजय भोसले, शरद गावडे, योगेश भोसले, विश्वास भोसले, मदन खिलारे, प्रमोद टेकावडे, अमित गोंडे, दादा सोनवणे उपस्थित होते.
माळेगाव पोलीस दूरक्षेत्रात पदभार स्वीकारणा-या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.
२६०८२०२१-बारामती-०९