मोक्काच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:34+5:302021-09-09T04:15:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता ४५ दिवसांचा जामीन मंजूर केला ...

For the first time in Mocca case, 45 days temporary bail | मोक्काच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन

मोक्काच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच ४५ दिवसांचा तात्पुरता जामीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्याला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता ४५ दिवसांचा जामीन मंजूर केला आहे. त्याच्या आईला कर्करोग झाला आहे. आईची स्थिती गंभीर असून, अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निकाल दिला आहे.

मोक्कामध्ये तात्पुरत्या जामिनाची तरतूद नाही. मात्र, तो सहा वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. मंगेश शाम सातपुते असे त्याचे नाव आहे. त्याच्या वतीने ॲड. जैद अन्वर कुरेशी आणि ॲड. इब्राहिम अब्दुल शेख यांनी काम पाहिले. त्यांना अश्रफ आख्तर शेख आणि अफरोझ इब्राहिम शेख यांनी सहकार्य केले. आरोपीला खडक मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मोक्का कायदा १९९९ मध्ये अस्तित्वात आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोणालाही तात्पुरता जामीन दिला गेला नाही. या प्रकरणात आरोपीच्या आईची स्थिती खूपच गंभीर असून, याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. मोक्काच्या गुन्ह्यामध्ये तात्पुरत्या जामिनाची तरतूद नसली, तरीही तात्पुरता जामीन मंजूर करण्यास कोणतीही स्पष्ट बंदी नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. त्यानंतर त्याला काही अटी आणि शर्तींवर तात्पुरता जामीन देण्यात आला.

-------------------------------------

Web Title: For the first time in Mocca case, 45 days temporary bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.