सोरतापवाडीत सहा दशकांनंतर प्रथमच सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:31+5:302021-01-19T04:12:31+5:30
उरुळी कांचन: सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत स्थापनेच्या तब्बल सहा दशकानंतर ग्रामपंचायतीवर सत्तांतर घडले आहे. पूर्व हवेलीतील ...
उरुळी कांचन: सोरतापवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत स्थापनेच्या तब्बल सहा दशकानंतर ग्रामपंचायतीवर सत्तांतर घडले आहे.
पूर्व हवेलीतील भाजपच्या हातात असलेली एकमेव ग्रामपंचायत या निवडणुकीत हातातून निसटली.
ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी व युवा नेते सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले आहे. विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो विकास आघाडीला ८ जागांवर विजय मिळवता आल्याने सत्तेवर कब्जा मिळविता आला आहे.
सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या १५ जागांपैकी ११ जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. ११ जागांसाठी सत्ताधारी सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल, तर विरोधात
राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी ,माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते अजिंक्य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडी यांच्यात झालेल्या लढतीत सोरतापेश्वर पॅनेलने ११ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. तर यापूर्वी या पॅनेलची वाॅर्ड क्र. एक मधून १ जागा बिनविरोध निवडून आल्याने सोरतापेश्वर पुरस्कृत पॅनेलला ८ जागा मिळवून ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त झाले आहे. निवडणुकीत प्रत्यक्ष लढविलेल्या ११ जागांपैकी भाई के.डी. चौधरी पुरोगामी पॅनेलला केवळ ४ जागा राखता आल्या आहेत. सत्तेला खिंडार पाडण्यात यशस्वी ठरणाऱ्या सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व पॅनेल पुरस्कृत शिवशंभो ग्रामविकास आघाडीचे प्रचाराची यंत्रणा राष्ट्रवादीचे स्थानिक गाव पुढारी रामदास चौधरी, बाळासाहेब चोरघे व सोनबा चौधरी यांनी संभाळत विजय खेचून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
निवडणुकीत विजयी झालेले पॅनेल निहाय
उमेदवार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्र. १) शंकर ज्ञानोबा कड, सुप्रिया देवेंद्र चौधरी , रविंद्र मोहन गायकवाड (सोरतापेश्वर पॅनेल ) , प्रभाग क्र. २) विलास शंकर चौधरी , स्नेहल विठ्ठल चौधरी , सुनीता कारभारी चौधरी (भाई के.डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल ), प्रभाग ३) नीलेश विठ्ठल खटाटे ,पूनम नवनाथ चौधरी (शिवशंभो आघाडी ) , अश्विनी चंद्रकांत शेलार ( पुरोगामी पॅनेल) , प्रभाग क्र. ४) विजय सर्जेराव चौधरी , मनीषा नवनाथ चौधरी ,सोनाली नागनाथ लोंढे (पुरोगामी पॅनेल )
प्रभाग ५) सूरज उर्फ सनी पोपट चौधरी , संध्या अमित चौधरी व शशिकांत दशरथ भालेराव (सोरतापेश्वर पॅनेल).
१८ उरुळी कांचन सोरतपवाडी