अडीच महिन्यानंतर शहरात प्रथमच रुग्णसंख्या सातशेच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:25+5:302021-05-18T04:11:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात तब्बल अडीच महिन्यानंतर कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढ सातशेच्या आत आली आहे. सोमवारी दिवसभरात केवळ ...

For the first time in two and a half months, the number of patients in the city is less than 700 | अडीच महिन्यानंतर शहरात प्रथमच रुग्णसंख्या सातशेच्या आत

अडीच महिन्यानंतर शहरात प्रथमच रुग्णसंख्या सातशेच्या आत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात तब्बल अडीच महिन्यानंतर कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढ सातशेच्या आत आली आहे. सोमवारी दिवसभरात केवळ ६८४ जण नवे रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात २ मार्च रोजी प्रथमच सर्वाधिक म्हणजे ६८८ कोरोनाबाधित एकाच दिवशी आढळून आले होते. तद्नंतर हजार, दीड, दोन हजारांच्या पुढे दररोज वाढत जाणारी ही बाधितांची संख्या सोमवारी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे.

शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण हे दहा हजारांच्या पुढे असतानाही, सोमवारी (दि.१७) तपासण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. आज दिवसभरात ८ हजार ८६२ जणांनी तपासणी करून घेतली आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ८.७० टक्के इतकी आहे. १२ ते १५ टक्क्यापर्यंत असलेली कोरोनाबाधितांची रोजची टक्केवारीही, गेल्या अडीच महिन्यात प्रथमच दहा टक्क्यांच्या आत आली आहे. तर शहरातील सक्रिय रुग्ण संख्याही वीस हजाराच्या आत आली आहे. आजमितीला शहरात १८ हजार ४४० सक्रिय रुग्ण आहेत. आज दिवसभरात २ हजार ७९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६८ टक्के आहे.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ५ हजार २८७ बाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४०२ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ७२ हजार ३४ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख ५९ हजार ९८७ जण बाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ३३ हजार ७९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: For the first time in two and a half months, the number of patients in the city is less than 700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.