आधी न्यूड कॉल, नंतर स्क्रीनशॉट पाठवून ब्लॅकमेल! सेक्सटॉर्शनमध्ये ज्येष्ठाला साडेचार लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: July 6, 2024 05:18 PM2024-07-06T17:18:27+5:302024-07-06T17:18:42+5:30
लगेच बँक खात्याची माहिती येते आणि अमुक-अमुक रक्कम या खात्यावर भर नाहीतर हे फोटो तुमच्या नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणीला पाठवू अथवा सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी येते अन् पीडित सेक्सटॉर्शनचा बळी ठरतो....
पुणे : अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ कॉल येतो... प्रोफाईल फोटो आणि नावही मुलीचं... लगेचच मोहित होऊन व्हिडीओ कॉल उचलला जाताे अन् पाहतात तर समोर एक मुलगी नग्न अवस्थेत! हे पटकन फोन कट करतात आणि दुसऱ्याच मिनिटाला त्यांच्या व्हॅट्सऍपवर ७-८ फोटो येतात. ते फोटो असतात एका मुलीबरोबर अश्लील कृत्य करत असल्याचे भासवणारे 'स्क्रीनशॉट'. लगेच बँक खात्याची माहिती येते आणि अमुक-अमुक रक्कम या खात्यावर भर नाहीतर हे फोटो तुमच्या नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणीला पाठवू अथवा सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी येते अन् पीडित सेक्सटॉर्शनचा बळी ठरतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाची सेक्सटॉर्शन करून फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रावरची (दि. ५) घडला. प्रकरण मिटवण्यासाठी पैसे भरा असे सांगून धमकी दिली गेली आणि फिर्यादींना ४ लाख ४० हजार रुपये भरण्यासाठी भाग पाडले.
काय घ्याल काळजी?
- अनोळखी मोबाइल क्रमांक किंवा इंटरनेट आयडीवरून व्हिडीओ कॉल आल्यास तो उचलू नका.
- वैयक्तिक भेटीसाठी सार्वजनिक ठिकाणे निवडा. त्याचबराेबच तुमच्या योजनांबद्दल कोणाला तरी कळवा.
- काही गडबड वाटत असेल तर तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवून तेथेच संभाषण थांबवा.
- इतरांना तुमच्याबद्दलची कोणती माहिती किंवा फोटो दिसत आहेत हे नियंत्रित करा.