मच्छीमारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:56+5:302021-09-04T04:14:56+5:30

बारामती : राज्यातील मच्छीमार व मत्स्य व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी ...

To fishermen | मच्छीमारांना

मच्छीमारांना

Next

बारामती : राज्यातील मच्छीमार व मत्स्य व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी उजनी मच्छीमार व्यावसायिकांच्या सामाजिक विकास संस्थेच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी राज्यमंत्री भरणे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, राज्यात गोड्या व खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. अपवाद वगळता बहुतांश मच्छीमार असंघटित आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या १३, १३.१ या शासन निर्णयानुसार मच्छीमार व मत्स्य व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींना विमाकवच देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून या योजनेची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करावी. गरीब मच्छीमारांना न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

०३ बारामती मच्छीमार

मच्छीमार व्यावसायिक संघटनेच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.

Web Title: To fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.