प्रतिबंधीत क्षेत्रात मासेमारीमुळे उजनीची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:15+5:302021-07-24T04:08:15+5:30
(सुधाकर बोराटे) बाभूळगाव: महाराष्ट्रात पाणी साठवण क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या माढा तालुक्यातील भीमानगर जवळील उजनी धरण प्रतिबंधीत क्षेत्राचे ...
(सुधाकर बोराटे)
बाभूळगाव: महाराष्ट्रात पाणी साठवण क्षमतेने सर्वात मोठे असलेल्या माढा तालुक्यातील भीमानगर जवळील उजनी धरण प्रतिबंधीत क्षेत्राचे उल्लंघन करून परप्रांतिय व स्थानिक मच्छीमार हे दिवसरात्र मासेमारी करत असल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये धरण सुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधाच उपलब्ध नसल्याने धरण सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
बलाढ्य उजनी धरणावर सध्या सोलापूर ग्रामीणचे तीन पोलीस कर्मचारी व सात माजी सैनिक हे दिवस रात्र, तीन शिप्टमध्ये पहारा देत आहेत. यामध्ये सोलापुर पोलीस हे भीमानगर गेटची सुरक्षा सांभाळत आहेत. पूणे ग्रामीण पोलीस यंत्रणेकडून उजणी धरणावर पोलीस सुरक्षा कर्मचारी देण्याबाबत वारंवार टाळण्यात येते. त्यामुळे उजनी धरणाच्या इंदापूर गेटला पोलीस सुरक्षाच नसल्याची समोर आल्याने उजणीची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ ३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर उजणीच्या सुरक्षेचा भार आहे.
उजनी धरण मुख्य दरवाजा लगतचा ६०० मीटर परिसर खासगी व्यक्तींना प्रतिबंधीत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई निर्बंध जारी आहेत. तरीही प्रतिबंधीत क्षेत्रात सुरक्षा रक्षकांच्या समोर राजरोसपणे मासेमारी होत असल्याने सुरक्षा रक्षकांच्या निष्ठेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. तर मच्छीमारांच्या आडून धरण परिसराला देशांतर्गत किंवा व बाह्य विध्वंसक आतंकवादी शक्तिकडूनही धोका होण्याची शक्यता प्रसारमाध्यमांनी व जानकार तज्ञांनी अनेकदा व्यक्त केली आहे. तरीही धरण सुरक्षेच्या बाबतीत शासन इतके बेपरवाई का आहे ? याचे कोडे अद्याप उलगडत नाही.
उजनी धरणासाठी आवश्यक असलेल्या एकुण सरक्षा व्यवस्थेच्या २० टक्यापेक्षाही कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे उजनी धरण परिसरात सुरक्षेसाठी अडचणी निर्माण होत आहेत. वरीष्ठ कार्यालयाकडून शासनस्तरावर याबाबत वारंवार माहिती देऊन व पत्रव्यवहार करून देखील शासन सुरक्षेच्या बाबतीत व सुविधांच्या बाबतीत गांभिर्याने घेत नसल्याने प्रतिबंधीत क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होत नाही. धरण क्षेत्रात आपत्कालीन स्थिती उदभवल्यानंतर त्यावर उपाय योजना करण्यासाठी वॉच टॉवर, सर्च लाईट सुविधांच उपलब्ध नाही. तर प्रतिबंधीत क्षेत्रातील मासेमारीचा बीमोड करण्यासाठी व त्याला प्रतिबंध करण्यासाठी पाण्यात उतरून कारवाई करण्यासाठी लागणारी सर्वात महत्वाची पाण्यातील बोट सुविधा उपलब्ध होत नसल्याने धरण परीसरात सुरक्षा व्यवस्था सांभाळणे अवघड जात आहे.
उजनी धरण प्लसमध्ये
जून २०२१ च्या मध्यान्हामध्ये उजणी धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन वजा २१.४३ अशी झाली होती. सध्या उजणी धरण परिसर व पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने खडकवासला धरण गुरूवारी पूर्ण भरल्याने खडकवासला धरणातून उजणी धरणासाठी २५ हजार ०३६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजणीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असुन शूक्रवारी धरणातील पाण्याची पातळी चांगली वाढली. उजणी धरण मायनसमधुन प्लसमध्ये आले असल्याची माहीती उजणी पाटबंधारे कार्यकारी अभायंता आर.पी.मोरे यांनी दीली.
उजणी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता, उप विभागीय अभियंता, व शाखा अभियंता या तीनही प्रमुख पदांचा कार्यभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने या अधिकाºयांना ठाम निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नावाची खुर्ची सांभाळण्या पलीकडचे अधिकार नसल्याने धरण व्यवस्थापन कामांचा बोजवारा उडाल्याची बाब कटाक्षाने समोर येत असुन कायम स्वरूपी अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अधिक गरजेचे आहे.
-आर.पी.मोरे.
उजणी पाटबंधारे कार्यकारी अभियंता.
उजणी धरणाच्या गेटजवळ २५ फुट अंतरावर मासेमारी करणारे बोटीसह मच्छीमार.
२३०७२०२१-बारामती-०९