तंदुरुस्तीसाठी ...फंक्शल ट्रेनिंंग घ्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:11+5:302021-07-27T04:11:11+5:30
फंक्शनल ट्रेनिंंगचे फायदे शरीराची हालचाल होणे अत्यंत महत्त्वाचे असते. फंक्शनल ट्रेनिंंग हे स्नायूंच्या कृतींवर नाही तर हालचालींच्या विविध ...
फंक्शनल ट्रेनिंंगचे फायदे
शरीराची हालचाल होणे अत्यंत महत्त्वाचे असते. फंक्शनल ट्रेनिंंग हे स्नायूंच्या कृतींवर नाही तर हालचालींच्या विविध पद्धतींवर अवलंबून आहे. क्रीडापटूंना स्पर्धेत अधिक कार्यक्षमतेने खेळावे लागते. त्यासाठी प्रशिक्षक त्यांच्या`व्यायामाचे नियोजन विशिष्ट पद्धतीने करतात. हे नियोजन करत असताना त्याचा केंद्रबिंदू हा हालचालींच्या विविध पद्धतीचा असतो. यामुळे क्रीडापटूंना त्यांची क्षमता वाढवण्यास मदत होते.
फंक्शनल ट्रेनिंंगमुळे शरीराच्या प्रत्येक भागाची अथवा अवयवांची हालचाल होत असते. त्यामुळे फंक्शनल ट्रेनिंंग घेणाऱ्यांचे शरीर चपळ बनते. चपळता वाढते. स्नायूंचा समन्वय वाढतो. त्यामुळे हालचाली करताना शरीराला इजा होण्याचा धोका कमी होतो.
कॅलरी बर्न
खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत असते. त्यासाठी कॅलरी बर्न करण्याची गरज असते. त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. काही जण चालतात, धावतात. पण त्याचा फार उपयोग होत नाही. फंक्शनल ट्रेनिंंगमुळे कॅलरी बर्न होणे अधिक सोपे होते.
एरोबिक क्षमता विकास :
शरीराची चपळपणे हालचाल होण्यासाठी कार्डिओचा वापर केला जातो. यामुळे एरोबिक क्षमता सुधारते.
माणसाच्या शरीरातील काही भाग अत्यंत महत्त्वाचे असतात. ते मजबूत असल्यास शरीर बळकट राहते.
शरीरातील काही महत्त्वाच्या भागांचा विकास अधिक भक्कम किंवा मजबूत होणे आवश्यक आहे. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम (मजासंस्था) शरीराचा बॅलन्स ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. फंक्शनल ट्रेनिंंगमुळे स्नायूंना बळकटी मिळून नर्व्हस सिस्टिमचे रक्षण होते. त्याचबरोबर शरीराची ठेवण योग्य पध्दतीने होते. जखमा लवकर बऱ्या होतात.
आनंदी मनासाठी...
व्यायामाने शरीरावर सकारात्मक परिणाम होऊन मनही आनंदी होते. फंक्शनल ट्रेनिंंगमुळे शरीराला नवी उर्जा (एनर्जी) मिळते. याचे कारण म्हणजे संपूर्ण शरीराची हालचाल होत असते.