ओतूर वनक्षेत्रात आग लावण्या-या पाच आरोपींना अटक ;२ झाडे हजार झाली होती भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:45 AM2020-04-06T08:45:22+5:302020-04-06T08:48:45+5:30
ओतूर येथील वनविभागाच्या हद्दीत मेंगाळवाडी जवळील धुरनळी येथे रात्री चुल करून जेवण बनविणा-या तसेच वनव्यास कारणीभूत ठरलेल्या पाच जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर नेले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
ओतूर : ओतूर येथील वनविभागाच्या हद्दीत मेंगाळवाडी जवळील धुरनळी येथे रात्री चुल करून जेवण बनविणा-या तसेच वनव्यास कारणीभूत ठरलेल्या पाच जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर नेले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पोलीस आणि वनकर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल शंकर वारे (वय २१ रा.मेंगाळवाडी), वैभव कोंडीभाऊ वारे (वय २२ रा.मेंगाळवाडी), प्रदीप यशवंत खंडागळे (वय २० रा.मेंगाळवाडी), सागर गेनभाऊ खंडागळे (वय २२, रा.वाघदरा), मयूर दत्तात्रय वारे (वय२० रा.मुंजेवाडी) असे आरोपींची नावे आहेत.
ओतूर (ता.जुन्नर) वनविभागाच्या हद्दीती धूरनळी येथे शनिवारी रात्री ९ वजता विभागाचे वनरक्षक व्ही. आर अडागळे आणि वनमजूर नित्याप्रमाणे गस्त घालीत होते. यावेळी त्यांना धूर दिसला. ते जवळ गेले असता त्यांना पाच युवक चूल करून बिर्याणी करत असल्याचे दिसले. वनकर्मचा-यांनी आग विझवून त्यांच्याजवळील साहित्य आणि दोन दुचाकी जप्त केल्या. या घटनेची माहिती आणि आरोपींची माहिती माहिती वनरक्षक विशाल अडागळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांना कळवली. सुरवातीला त्यांना समज देऊन सोडून दिले. तसेच वनवा पेटवाल तर जेल मध्ये जाल अशी ताकीदही दिली. आणि सोडून दिले. सुमारे अर्धा तासानंतर तेथील वनमजुराने वनखंड राखीव ३३ येथील रोप वनक्षेत्रास आग लागली असे कळविले. ही घटना वनपरिक्षेत्र अधिकारी योगश घोडके यांना कळविली. वनपरीक्षेत्र अधिकारी घोडके एस ए .राठोड वनरक्षक के.एम.खारोडे हे घटनास्थळी गेले झाले. या आगीत जवळपास २ हजार झाडे जळाली. दोन वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपक्षेत्राच्या आगीला हेच कारणीभूत असल्याचे तपासणीत आढळल्यानंतर वनकर्मचा-यांनी त्यांना जुन्नरन्यायालयात हजर केले. जुन्नर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे .