दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींवर मोक्का

By admin | Published: January 10, 2016 03:49 AM2016-01-10T03:49:33+5:302016-01-10T03:49:33+5:30

दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत, तर चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली.

Five accused in the robbery case | दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींवर मोक्का

दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींवर मोक्का

Next

शिरूर : दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत, तर चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली. मागील वर्षभरात घडलेल्या खुनाचे सात गुन्हे, तर दरोड्याचे पाचपैकी चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले असून, करडे येथील दरोड्याच्या गुन्ह्याचाही लवकरच छडा लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सागर दादा कामठे (रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर),
धनाजी चंद्रकांत गोंडवाल (रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे), दिगंबर किसन ससाणे (रा. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे), दिगंबर किसन ससाणे (रा. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे), महेश नागनाथ वाल्हेकर (रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे), मिलिंद हनुमंत भांडवलकर (रा. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे) अशी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
राहुल सुखदेव खेडकर (रा. खंडाळे माथा, ता. शिरूर, जि. पुणे), राहुल गणपत खळदकर, (रा. पिंपरी दुमाला, ता. शिरूर, जि. पुणे), मयूर सुनील गावडे, नितीन चंद्रकांत गायकवाड व प्रवीण प्रकाश शिर्के (तिघेही, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे) या पाच जणांना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
आॅगस्ट २०१५ मध्ये पिंपळसुटी येथे दरोडा पडला होता. यात मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या पाच जणांना शिरूर पोलिसांनी अटक केली होती. यात लूट केलेल्या १ लाख ८० हजार ऐवजापैकी पोलिसांनी १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला होता.
तडीपार केलेल्या पाच आरोपींनी शिरूर व रांजणगाव एमआयडीसी परिसरात चोऱ्या केल्या आहेत. दरोड्याच्या पाचपैकी चार प्रकरणांचा तपास लावला. करडे येथील दरोड्याचाही लवकरच छडा लावला जाईल, असे निंबाळकर यांनी सांगितले.

Web Title: Five accused in the robbery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.