वडिलांच्या स्मरणार्थ ट्रस्टला केली पाच एकर जमीन दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:24 PM2018-01-30T19:24:03+5:302018-01-30T19:24:06+5:30

जगद्गुरू श्री संत तुकोबारायांना गुरूंचा उपदेश, साक्षात्कार, अनुग्रह झाला तो माघ शुद्ध दशमी या तिथीला. या माघ शुद्ध दशमीच्या तिथीला वारकरी सांप्रदायात अनन्य साधारण असे महत्व असून

Five acres of land donated to the Trust for the memorial of the father | वडिलांच्या स्मरणार्थ ट्रस्टला केली पाच एकर जमीन दान

वडिलांच्या स्मरणार्थ ट्रस्टला केली पाच एकर जमीन दान

Next

हनुमंत देवकर
चाकण : जगद्गुरू श्री संत तुकोबारायांना गुरूंचा उपदेश, साक्षात्कार, अनुग्रह झाला तो माघ शुद्ध दशमी या तिथीला. या माघ शुद्ध दशमीच्या तिथीला वारकरी सांप्रदायात अनन्य साधारण असे महत्व असून या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी सोहळा समितीच्या वतीने गेल्या सोमवार पासून मोठ्या उत्साहपूर्ण, भक्तिमय भावाने सुरू असणाऱ्या अखंड गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची सांगता सोमवारी दुपारी १२ वा. भागवताचार्य,  विद्यावाचस्पती हभप विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

‘वृंदावनी आनंदू रे | विठ्ठलू देव आळविती रे || या विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर निरुपण करीत हभप मिसाळ महाराजांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून, दृष्टातांमधून सांगितल्या. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, परमार्थ, वैराग्य सांभाळत, जोपासत एवढी मोठी उंची गाठली तरी महाराजांना देखील आपल्या जीवनात विविध आघात सोसावे लागले. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु तुकोबारायांची परमप्रिय श्री पांडुरंगावरील भक्ती, निष्ठा कधीही कमी झाली नाही. आपल्याही जीवनात, संसारात प्रसंगी येणारे आघात सोसा, संकटे सोसत, धीरोदत्तपणे संकटांना सामोरे जा, कारण मरेपर्यंत संसारात संकटे सोडीत नसतात म्हणूनच भक्तिमय मार्गाने संसार करा, शुद्ध भाव ठेवा, व्यसने करू नका, कोणाचाही मत्सर करू नका असा उपदेश करीत वारकऱ्याच्या गंधाची, तुळशीमाळेची, फाटक्या प्रपंच्याची कोणी टीका करू नये. संतांवर, देव, भक्तांवर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत कठोर शब्दांत मिसाळ महाराजांनी सांगितले. काल्याच्या कीर्तन प्रसंगी मावळ चे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार सुरेश गोरे, मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे, मावळ भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे, मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश ढोरे आदी मान्यवर तसेच परिसरातील व मावळ, मुळशी, खेड, हवेली तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्तीथ होते.

बाळासाहेब काशीद यांचेकडून वडिलांच्या स्मरणार्थ भंडारा डोंगर ट्रस्टला पाच एकर जमीन दान

सन २००५ मध्ये साहेबराव उर्फ बाळासाहेब काशीद पाटील यांनी कराळे पाटील परिवाराला वैयक्तिकरित्या पंधरा लाख रुपये अदा करून डोंगरावर आता ज्याजागी मंदिर उभे राहत आहे त्या शेजारील पाच एकर जमीन ट्रस्टच्या नावे खरेदी केली होती. वैयक्तिकरित्या खरेदी केलेली सदर पाच एकर जमीन आज या काल्याच्या कीर्तन प्रसंगी वै.आनंदराव काशीद पाटील यांच्या स्मरणार्थ, सर्व उपस्थित भाविकांच्या साक्षीने साहेबराव काशीद पाटील यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टला दान करीत अर्पण केली.

 पहाटे अभिषेक, महापूजा, काकडा आरती झाल्यानतर सकाळी ७.३० वा. गाथा पारायणाचा समारोप हभप गुरुवर्य, गाथामूर्ती नाना महाराज तावरे यांच्या अधिपत्याखाली आरती होऊन करण्यात आला. पारायणाचा समारोप होताच हजारो वाचक भाविकांनी तुकोबारायांची गाथा, तुळशी वृदावन डोक्यावर घेत मुख्य मंडपातून संपूर्ण डोंगरावर ग्रंथ दिंडी काढली. ‘ज्ञानोबामाऊली- तुकाराम’ असा एकच नामघोष, गजर करीत महिला व पुरुष वाचक भाविकांनी फेर धरीत फुगड्या देखील मोठ्या आनंदाने घातल्या. ही ग्रंथ दिंडी परत प्रदक्षिणा करून मुख्य मंडपात आल्यानंतर श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व दशमी समित्याच्या वतीने हा सोहळा यशस्वी रित्या पार पडण्यासाठी ज्या मान्यवरांनी सहकार्य केले अशा सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, भाविक श्रोते, गायक, वादक तसेच आर्थिक व वस्तुरूपी देणगी देणारे सर्व दानशूर दाते तसेच या सोहळ्यामध्ये अहोरात्र झटणारे भंडारा डोंगर परिसराच्या गावांमधील ग्रामस्थ व तरुणांचे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व दशमी समितीच्यावतीने अध्यक्ष साहेबराव काशीद पाटील यांनी अंतकरण पूर्वक आभार मानले.

या सोहळ्यासाठी गेली आठ दिवस महाप्रसादाच्या स्वयंपकासाठी लागणारा भाजीपाला  भिमाजी दाभाडे यांच्या सहकार्यातून चाकण, पुणे तसेच नवी मुंबई मार्केट मधून मिळवून देणारे दत्तात्रय कुंडलिक दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, बबन माळी, दिलीप दाभाडे,  राजेद्र दाभाडे, अशोक दाभाडे, बाळासाहेब टेमगिरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्तम मंडप व्यवस्था देणारे महादू नेवाळे, आचारी महेंद्र हुलावळे, महाप्रसाद वाटपाचे काम करणारे खांडी, बोरावली ग्रामस्थ व तरुणांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता सर्व कार्यकर्त्यांसह सदाशिव गाडे, हभप रवींद्र महाराज ढोरे, जोपाशेठ पवार, जगन्नाथ नाटक पाटील, हभप मनोहरमामा ढमाले, विष्णू खांदवे, अरुण काशीद, शिवाजी पवार, पंडित भसे, शिवाजी शेलार,  भरत मांडेकर,  विजय नाटक, नारायण गाडे यांनी गेली महिनाभर विशेष परिश्रम घेतले. 

Web Title: Five acres of land donated to the Trust for the memorial of the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.