साखरे वस्तीत पाच एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 11:17 PM2023-11-02T23:17:09+5:302023-11-02T23:19:16+5:30
आधीच आयटीपार्कमध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी येथे काढणीला आलेला सुमारे पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला. हाती आलेल्या पिकाला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले, यामुळे हिंजवडी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. शेतातून गेलेल्या एमएसईबीच्या खांबावरील वायर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज शेतकरी ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आधीच आयटीपार्क मध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यात काही शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय आजही टिकवून आहे. मात्र, आधीच आसमानी आणि सुलतानी संकटामुळे हवालीदिल झालेला शेतकरी आशा नुकसानकारक घटनांमुळे अजून संकटात सापडलेला आहे. हिंजवडीचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी विक्रम साखरे यांच्याशी बोलले असता, गेल्या वर्षी सुद्धा अशीच शेतातील हाती आलेल्या उभ्या पिकाला एमएससीबी च्या खांबावरील वायरच्या शॉर्ट शॉर्टकट मुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. ती नुकसान भरपाई सोडाच, मात्र, यंदाही असाच प्रकार घडल्यामुळे, शेती करावी की नाही असा प्रश्न हिंजवडीतील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हिंजवडी परिसरात पिकांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, असं का होतंय, याला कोण जबाबदार आहे याची तपासणी करण्याची आग्रही मागणी हिंजवडीतील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी येथे काढणीला आलेला सुमारे पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला. हाती आलेल्या पिकाला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले, यामुळे हिंजवडी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. pic.twitter.com/GPjEoQjJ9Q
— Lokmat (@lokmat) November 2, 2023