इंदापूरातील कांदलगावात आगीत पाच एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 17:30 IST2021-11-24T17:30:22+5:302021-11-24T17:30:46+5:30
शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या मदतीने पाणी उपलब्ध करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

इंदापूरातील कांदलगावात आगीत पाच एकर ऊस जळून खाक
बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील कांदलगाव असणाऱ्या भांगेवस्तीत परिसरातील ऊस पाकाला लागलेल्या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
कांदलगांव येथील ऊस बागायतदार शेतकरी महेश दादासाहेब जोशी, महेश रामहरी बोबडे व बाळासाहेब राजाराम मोकाशी या शेतकऱ्यांचा अंदाजे ५ ते ६ एकर ऊस जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ऊसाला लागलेल्या आगीचे लोट दिसताच स्थानिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या मदतीने पाणी उपलब्ध करून ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.