राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 06:43 PM2023-02-13T18:43:54+5:302023-02-13T19:32:14+5:30

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशनासाठी सर्व शिक्षक जाणार

Five consecutive days of holiday for schools in the state 3 days special leave for teachers | राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी; शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा

googlenewsNext

बारामती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने १५ ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे, राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुट्टीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी येथील चंपक मैदानावर १७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक जण उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा यावेळी बंद राहणार आहेत. राज्य शासनाने या अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांसाठी १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व १९ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुट्टी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे.

 जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता, महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण, एम एस सी आय टी मुदतवाढ, शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती यांसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणाकडे लक्ष

शिक्षक संघाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत, शिक्षकांच्या विशेष रजेसाठी शालेय शिक्षण, ग्रामविकास व नगरविकास विभागास खुद्द मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश दिले गेले आहेत .यामुळे प्रत्यक्ष अधिवेशनात शिक्षकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या घोषणा करतात याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातून १० हजार शिक्षक जाणार

पुणे जिल्ह्यातून रत्नागिरी येथील अधिवेशनासाठी १० हजार हून अधिक सभासदांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

Web Title: Five consecutive days of holiday for schools in the state 3 days special leave for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.