शहरी गरीब योजनेला पाच कोटींच्या वर्गीकरणास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:19 AM2021-02-18T04:19:45+5:302021-02-18T04:19:45+5:30
यावेळी काही नगरसेवकांनी ही योजना चुकीच्या दिशेला जात असून रुग्णालयांच्या फायद्यासाठी राबविली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला. ...
यावेळी काही नगरसेवकांनी ही योजना चुकीच्या दिशेला जात असून रुग्णालयांच्या फायद्यासाठी राबविली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक सुभाष जगताप यांनी या योजनेची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. तर जी रुग्णालये या योजनेचा लाभ नागरिकांना देत नाहीत, किंवा योजनेचे पत्र स्वीकारण्यास तयार होत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक संजय भोसले यांनी केली. लाभार्थी वाढत असताना रक्कम कमी पडते आहे. त्यामुळे अधिकाधिक तरतूद करावी, असे नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले.
यावर सभागृह नेते गणेश बीडकर यांनी या योजनेला पैसे कमी पडू देणार नाही, असे सर्वसाधारण सभेला आश्वस्त केले. यासोबतच ज्या रुग्णालयांची बिले थकीत आहेत त्यांची बिले देण्याची व्यवस्था करावी, नागरिकांना त्रास होता योजना राबविली जाईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या. या वेळी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अनेक रुग्णालये नागरिकांशी गैरवर्तणूक करतात हे सत्य आहे. पालिका त्यांचे पैसे देणे लागत असली, तरी त्याचा अर्थ त्यांनी नागरिकांना उपचार देऊ नयेत असा होत नाही. अशा रुग्णालयांना प्रशासनाने योग्य सूचना देण्याचे आदेश दिले.