पाच कोटी डोस तयार, मान्यतेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:19+5:302020-12-30T04:16:19+5:30
कोविशिल्डच्या चाचण्यांमधील निष्कर्षांचा सध्या सर्व पातळ््यांवर अभ्यास केला जात आहे. केवळ भारतातील नव्हे तर युकेसह अन्य देशांमध्ये झालेल्या चाचण्यांच्या ...
कोविशिल्डच्या चाचण्यांमधील निष्कर्षांचा सध्या सर्व पातळ््यांवर अभ्यास केला जात आहे. केवळ भारतातील नव्हे तर युकेसह अन्य देशांमध्ये झालेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांचीही पडताळणी केली जात आहे. लसीच्या सुरक्षेच्या कोणत्याही निकषांशी तडजोड केली जाणार नाही. सर्व निकषांची पुर्तता करून जानेवारी महिन्यात लसीबाबत ‘गुड न्युज’ दिली जाईल, असा दावाही अदर यांनी केला.
लसीला मान्यता मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात भारताला ५ कोटी डोस दिले जाऊ शकतात. यापैकी किती डोस घ्यायचे, त्याचे वितरण, नियोजन केंद्र सरकारला करायचे आहे. जुलै महिन्यापर्यंत ३० कोटी डोस तयार असतील. तरीही पहिल्या सहा महिन्यात लसीचा मोठा तुटवडा जाणवेल. पण नंतर अनेक लसीं प्रत्यक्ष उपलब्ध होऊ लागल्यानंतर त्यात बदल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
--------