खेड तालुक्यातील विकासकामांसाठी पाच कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:36+5:302021-04-30T04:13:36+5:30

राजगुरुनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे खेड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार दिलीप मोहिते ...

Five crore sanctioned for development works in Khed taluka | खेड तालुक्यातील विकासकामांसाठी पाच कोटी मंजूर

खेड तालुक्यातील विकासकामांसाठी पाच कोटी मंजूर

Next

राजगुरुनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे खेड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते.

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील ३६ कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या (२५१५) योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे यांनी दिली.

शेलपिंपळगाव ते माणिक रस्ता डांबरीकरण करणे २० लाख, शेलपिंपळगाव ते चिंचोशी रस्ता डांबरीकरण करणे २० लाख, कुडे खुर्द येथिल घोंगे वस्ती ते भैरवनाथ मंदिर ५०० मी काँक्रिटीकरण करणे १५ लाख, वाघू फाटा ते वाघू गाव जोडरस्ता डांबरीकरण करणे २० लाख, दावडी गावठाण अंतर्गत काँक्रिटीकरण करणे १५ लाख, वेताळे येथे महिलांसाठी अस्मिताभवन बांधणे १५ लाख, बीबी येथिल गणपती मंदिर ते देवराम भोरवस्ती (१ किमी)रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, एकतानगर येथील गणेश मंदिरासमोरील जागेत सभामंडप बांधणे १० लाख, मरकळ बागवान वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, मरकळ बाजारेवस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, वडगाव घेनंद येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, बुरसेवाडी येथे १९७ भीमाशंकर गुंडाळवाडी ते उंबराचीठाकरवाडी (१.५ किमी) रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लाख, कडूस येथील पानमंदवाडी ते स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, कोहिंडे बु.ते तळवडे रस्ता व तळवडेपासून कुंडेश्वर देवस्थान रस्ता करणे ३० लाख, पाईट येथील गावठाण अंतर्गत पाईट विकास सोसायटी ते दशक्रिया घाट (गायमुख) रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, गोसासी येथे बहुउद्देशीय संस्था इमारत बांधणे १० लाख, गोसासी ते वाकळवाडी २.५ रस्ता डांबरीकरण करणे २० लाख, गारगोटवाडी येथे गारगोटवाडी ते जि.प.शाळा रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे १५ लाख, कोरेगाव येथील गोगावलेवस्ती ते लोंढेवस्ती रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, गुंजवठा ते कमान जोडरस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, मेदनकरवाडी येथील अंतर्गत रस्ता करणे १० लाख, पिंपळगाव तर्फे चाकण येथील शाळा व ग्रामपंचायत मधील संरक्षक भिंत बांधणे ५ लाख, सोळू येथील श्री विठ्ठल निवृत्ती ठाकूर यांचे राहते घर ते खटकाळी वस्ती(मातंगवस्ती) रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, वाफगाव येथील धरणवस्ती रस्ता डांबरीकरण व मोरी बांधकाम करणे १० लाख, वाडा येथील आंद्रेवाडी नहरेवस्ती रस्ता करणे १० लाख, तोरणे बु. ते शिंदेवस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, बुरसेवाडी येथे शिरूर भीमाशंकर हायवे ते वेताळेश्वर मंदिर (१ किमी) रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे १५ लाख, शिवे येथील खंडोबावस्ती ते भरतदादा सातपुते वस्ती रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे ५ लाख, पापळवाडी येथील पापळवाडी ते चास रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, आंबोली येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे १५ लाख, वाजवणे एसटी.स्टँड ते गावठाण रस्ता काँक्रिटीकरण करणे १५, कुडे बु.येथिल गेंगजेवस्ती ते बांगरवस्ती भीमाशंकरवाडी येथे रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे १५ लाख, पाळू येथील अनावळे रस्ता ते आंद्रेवाडीकडे जाणार रस्ता ३०० मी रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, तोरणे बु. ते पाईट रस्तादुरुस्ती व रुंदीकरण करणे ३० लाख, नायफड येथील गावठाण येथे सामाजिक सभागृह बांधणे १० लाख रुपये या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Five crore sanctioned for development works in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.