भीमा नदीत सहा दिवसांत मिळाले पाच मृतदेह; पुणे जिल्ह्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:55 PM2023-01-24T14:55:40+5:302023-01-24T14:59:21+5:30

 पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली...

Five dead bodies found in Bhima river in six days Pune district latest crime news | भीमा नदीत सहा दिवसांत मिळाले पाच मृतदेह; पुणे जिल्ह्यात खळबळ

भीमा नदीत सहा दिवसांत मिळाले पाच मृतदेह; पुणे जिल्ह्यात खळबळ

googlenewsNext

(पुणे) : पुणे जिल्ह्यात भीमा नदीत चार मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आज (२४ जानेवारी) अजून एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या सहा दिवसांत पाचवा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली आहे.

यापूर्वी पारगाव परिसरात पाच दिवसांत चार मृतदेह मिळाले होते. आज दुपारी एक वाजता एका लहान मुलाचा (अंदाजे वय ७) मृतदेह मिळून आला आहे. पारगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधी आढलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष व दोन स्त्रियांचा समावेश होता. ते अंदाजे ३८ ते ४५ वयोगटातील आहेत. एका पुरुषाचा मृतदेह नदीपात्रातून रविवारी  (दि. २२) उशिरा काढण्यात आला होता. मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती  सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले. यावरून तपासाला दिशा मिळाली असून यवत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आहेत.

सहा दिवसांत पाच मृतदेह-

पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवार दिनांक १८ रोजी एका स्त्रीचा मृतदेह त्यांना आढळून आला. तसेच परत  शुक्रवार दि. २० रोजी पुरुषाचा, शनिवार दि. २१ रोजी पुन्हा स्त्रीचा व रविवार दि. २२ रोजी एका पुरुषाचा मृतदेह असे सलग पाच दिवस ४ मृतदेह आढळून आले. आता आज (दि. २४) एका लहान मुलाचा मृतदेह आढळला आहे. भीमा नदीपात्रात सहा दिवसांत पाच मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या की घातपात हा मोठा प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणे बरोबरच स्थानिकांनाही पडला आहे. एकावेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

Web Title: Five dead bodies found in Bhima river in six days Pune district latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.