आमदार निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांची यंत्रणा कामाला -----पदवीधर, शिक्षक मतदार संघाची निवडणुकही ईव्हीएम मशीनवर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:37+5:302020-12-05T04:14:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातून प्रत्येकी एकच आमदार निवडून द्यायचा आहे. ...

Five district system works for MLA election ----- Graduate, teacher constituency election also take place on EVM machine | आमदार निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांची यंत्रणा कामाला -----पदवीधर, शिक्षक मतदार संघाची निवडणुकही ईव्हीएम मशीनवर घ्या

आमदार निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांची यंत्रणा कामाला -----पदवीधर, शिक्षक मतदार संघाची निवडणुकही ईव्हीएम मशीनवर घ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातून प्रत्येकी एकच आमदार निवडून द्यायचा आहे. परंतु या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लागते. यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने इतर निवडणुका प्रामाणे पदवीधर व शिक्षकची निवडणूक देखील ईव्हीएम मशीनवर घ्यावी. या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांना सांगितले.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघातून प्रत्येक एक आमदार निवडून द्यायचा आहे. यासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातार आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे मतदार संघ आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता आणि एकच उमेदवार निवडून द्यावयचा असला तरी निवडणुकीसाठी राबणारी यंत्रणा खूपच मोठी आहे. यामुळे ही निवडणूक देखील ईव्हीएम मशीनवर घ्यावी. यामध्ये मतदारांना पसंती क्रमांक देण्याचे बंधन घालावे. त्यामुळे या संदर्भात प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले. यासाठी कायद्यात बदल करावा लागेल असे देखील राव यांनी स्पष्ट केले.

-----

मनुष्यबळ आणि खर्च लक्षात घेतला पाहिजे

राज्यातील पाच ही पदवीधर मतदार संघात व शिक्षक मतदार संघातून प्रत्येकी केवळ एकच उमेदवार निवडून देण्यात येतो. परंतु यासाठी खूपच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि खर्च पडत आहे. त्यात मतमोजणीची प्रक्रिया देखील प्रचंड क्लिष्ट असल्याने दोन-दोन दिवस दिवस रात्र यंत्रणा कामाला लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवणार

- सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी

Web Title: Five district system works for MLA election ----- Graduate, teacher constituency election also take place on EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.