Pune | आज रेल्वेचा पाच तासांचा ब्लॉक, सात गाड्या येणार उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:51 AM2022-03-03T11:51:07+5:302022-03-03T11:55:07+5:30
जाणून घ्या कोणत्या गाड्या उशिराने धावणार....
पुणे :पुणे विभागातील केडगाव-पाटस दरम्यान भुयारी मार्गासाठी बॉक्स बसविणे व गर्डरच्या कामाकरिता गुरुवार (३ मार्च) रोजी सकाळी ११.२० ते दुपारी ०४.२० पर्यंत पाच तासांचा ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या काळात धावणाऱ्या गाड्यांना दोन तासाहून अधिक काळ उशीर होणार आहे.
त्यामुळे पुण्यात दाखल होणाऱ्या गाड्यांना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशीर होईल. दौंड-इंदूर एक्स्प्रेस ही दौंड स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेवर सुटण्याऐवजी ही गाडी दौंड स्थानकाहून दुपारी साडेचार वाजता सुटेल.
तसेच नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस, जम्मूतावी पुणे एक्स्प्रेस, बेंगलोर-मुंबई एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन वास्को द गामा, पुणे भुनेश्वर एक्स्प्रेस, मुंबई बेंगलोर एक्स्प्रेस लोणावळा-पाटस दरम्यान ०३ तास ४० मिनिटे उशिराने धावेल. त्यामुळे प्रवाशांनी या वेळा लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.