पाचशे कोरोना रुग्णांना घरीच नीट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:23+5:302021-04-24T04:10:23+5:30

मागील वर्षी कोरोना सुरू झाल्यापासून त्यांनी दक्षिण पुण्यात तसेच आजूबाजूच्या गावामध्ये होम व्हिजीट सुरू केल्या. कोरोना काळात नागरिकांची आर्थिक ...

Five hundred Corona patients will be treated at home | पाचशे कोरोना रुग्णांना घरीच नीट करणार

पाचशे कोरोना रुग्णांना घरीच नीट करणार

Next

मागील वर्षी कोरोना सुरू झाल्यापासून त्यांनी दक्षिण पुण्यात तसेच आजूबाजूच्या गावामध्ये होम व्हिजीट सुरू केल्या.

कोरोना काळात नागरिकांची आर्थिक परस्थिती अतिशय नाजूक झाली आहे, त्यामुळे आम्ही नाममात्र पैशात पेशंटला आरोग्य सेवा पुरवतो. अनेकांचे कोरोनामुक्त झाल्यावर फोन येतात व ते आभार मानतात हीच माझी कमाई आहे.

सध्या कोरोनाने देशात थैमान घातले आहे, सर्वत्र प्रचंड भीतीचे वातावरण आहे. मात्र नागरिकांनी एक लक्षात घेतले पाहिजे कोरोना हा आजार बरा होणारा आहे.

इतर रोगाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण या रोगात अतिशय कमी असून याची भीती मनातून कमी करण्याची आवश्यकता सध्या आहे. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, शासनाचे नियम पाळले पाहिजे. मात्र, भयभीत होण्याची आवश्यकता नाही. आपल्या शहराच्या आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण आहे. नागरिकांनी घरी राहून शासनाला सहकार्य करण्याचे आव्हान डॉ. रुपेश शिंगवी यांनी केले आहे.

Web Title: Five hundred Corona patients will be treated at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.