सूसन रुग्णालयाला पाचशे पीपीई किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:35+5:302021-04-19T04:09:35+5:30

पुणे : ‘कोरोना’ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना ‘कोरोना’ संकटाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाचशे पीपीई कीटचे मोफत वाटप ‘पार्थ पवार ...

Five hundred PPE kits to Susan Hospital | सूसन रुग्णालयाला पाचशे पीपीई किट

सूसन रुग्णालयाला पाचशे पीपीई किट

Next

पुणे : ‘कोरोना’ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना ‘कोरोना’ संकटाशी लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाचशे पीपीई कीटचे मोफत वाटप ‘पार्थ पवार फाउंडेशन’च्या माध्यमातून ससून रुग्णालयाला करण्यात आले. युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहरांसह अनेक भागात ‘कोरोना’चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य शासनाच्यावतीने ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात मोफत फिरता दवाखाना सुरू केला आहे. तसेच याच उपक्रमांतर्गत फाउंडेशनच्या माध्यमातून येथील ससून रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर स्टाफसाठी पाचशे पीपीई किट मोफत दिले आहेत. ‘पार्थ पवार फाऊंडेशन’च्या या मदतीबद्दल ससून रुग्णालयाच्यावतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी पार्थ पवार फाऊंडेशनचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगावचे नगरसेवक संतोष भेगडे आणि पार्थ पवार फाउंडेशनचे सिनिअर ऑपरेशन मॅनेजर नचिकेत खरात उपस्थित होते.

Web Title: Five hundred PPE kits to Susan Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.