चोरट्याकडून पाच लाखांच्या दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:48+5:302020-12-03T04:21:48+5:30
तालुका पोलिसांची कामगिरी बारामती : येथील तालुका पोलिस ठाण्याने केलेल्या कारवाईत दुचारी चोरास ताब्यात घेण्यात आले आहे. ...
तालुका पोलिसांची कामगिरी
बारामती : येथील तालुका पोलिस ठाण्याने केलेल्या कारवाईत दुचारी चोरास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकुण ८ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ज्ञानेश्वर बापू चव्हाण (रा. शेरे शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यावर यापुर्वी दरोडा,जबरी चोरी,मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी दिली. मागील अनेक महिन्यापासून बारामती तालुुका पोलीस ठाण्याच्या हददीतून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर गोपनीय माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर चव्हाणला फलटणहून ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस ठाणे, फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या विविध कंपनीच्या अंदाजे ५ लाख १० हजार रुपयांच्या एकुण ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर त्यापैकी ३ दुचाकी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, ५ दुचाकी मालकांचा शोध सुरू असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.
या कारवाईच्या पथकात सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार जयंत ताकवणे, दत्तात्रय सोननिस ,कॉन्टेबल विनोद लोखंडे, नंदू जाधव, मंगेश कांबळे, संतोष मखरे, प्रशांत राउत यांचा समावेश होता.
———————————————————————
फोटो ओळी : दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व पथक.
०२१२२०२०-बारामती-०१
——————————————