Pune | शिक्रापूर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:02 PM2023-01-27T20:02:19+5:302023-01-27T20:04:36+5:30

अपघातानंतर वाहन चालकांवर गुन्हे दाखल...

Five people died in different accidents in Shikrapur area pune crime news | Pune | शिक्रापूर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

Pune | शिक्रापूर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

googlenewsNext

शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर, कोरेगाव भीमा व जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे वेगवेगळ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीत २५ जानेवारीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महेश राजाराम गव्हाणे (वय २५ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) हा त्यांच्या ताब्यातील एम. एच. १२ व्ही. डी. १३९३ या दुचाकीहून चाललेला असताना पाठीमागून अहमदनगर बाजूने आलेल्या कारने (क्र. एम. एच. १२ एस. वाय. १९९०) धडक दिली. त्यात महेशचा मृत्यू झाला. दरम्यान महेश याला घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेची एम. एच. १२ डी. डब्ल्यू ६०७३ या दुचाकीला धडक बसून दुचाकी चालक श्रीकांत सूर्यकांत उबाळे (वय २६ रा. ढेरंगेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरुर) याचा मृत्यू झाला तर रुग्णवाहिका चालक वैभव गजानन डोईफोडे व अक्षय रवींद्र बनसोडे (रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरुर) हे जखमी झाले.

या दोन अपघातानंतर २६ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उद्धव सातपुते (वय ३५ रा. शिक्रापूर) हे शिक्रापूर पाबळ चौकातून रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात सातपुते यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चाकण रोड पंजाबी ढाबा समोर बाबूशोना शेख हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अजयभान भावसार हा शिक्रापूर चाकण रस्त्याचे नजीक हॉटेल चंद्रमा समोरून रस्ता ओलांडत असताना कारने (क्र. एम. एच. १४ के. जे. ६२१९) भावसार यांना धडक दिली त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Five people died in different accidents in Shikrapur area pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.