अपघातात निगडीतील एकाच कुटुंबातील पाच ठार ; सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:49 PM2018-05-18T18:49:11+5:302018-05-18T21:26:27+5:30
पुणे सोलापूर महामार्गावर अपघात : मोटारीचा टायर फूटून
पळसदेव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निगडीतल एका कुटुंबावर काळाने झडप घातली. मोटारीचा टायर फुटल्याने पाच पलट्या खात विरूद्ध दिशेला येऊन दुसºया मोटारीला धडकली. या भीषण पाच जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. तर दुसºया वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत.
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर १ गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि.१८ )सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, मोटारीचा चक्काचूर झाल्याने दोन जणांचे मृतदेह गॅस कटरने मोटारीचा पत्रा कापून एक तासानंतर बाहेर काढण्यात आले.
शितल संदीप गायकवाड (वय ३२), संदीप प्रकाश गायकवाड ( वय ४0), आभिराज संदीप गायकवाड (वय ५) , सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८), प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७, सर्व राहणार नाना नानी पार्क, यमुना नगर निगडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. यात पती-पत्नी, मुलगा, सून व नातू यांचा समावेश आहे.
तर जखमींमध्ये प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३२), हेमा प्रमोद गायकवाड (वय २९) यांचा समावेश आहे.
स्कॉर्पिओ मोटार सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात होती. डाळज नंबर १ गावचे हद्दीत आली असता, मोटारीचा टायर फुटला. अन ही मोटार पाच पलटया खात सोलापूर बाजूकडे जात असलेल्या दुसºया मोटारीस धडकली. या झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ मोटारीतील पाच जण जागीच ठार झाले. तसेच दोन जण जखमी झाले आहेत.
भरधाव वेग हाच अपघाताला कारणीभूत ठरला. अपघाताचा आवाज येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माहिती मिळताच, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सचिन जगताप, गोरख पवार, वाघ, यांसह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत.
भरधाव वेगाने घेतले बळी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. भरधाव वेग अन पुढे जाण्याची स्पर्धा यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. चारचाकी वाहने ससरासरी १४0 वेगाने जातात. या वेगामुळे टायर गरम होऊन फुटणे, ब्रेक निकामी होणे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र या कडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
स्पीड गण मशीन कधी बनविणार?
महामार्गचे चौपदरीकरण झाले खरे. मात्र रस्ता सुसज्ज झाल्याने सहाजिकच वाहनांचा वेग वाढला. अन अपघातांचे प्रमाण वाढले. स्पीड मशीन बसविल्यास वाहनांचा वेग समजू शकेल. मात्र याबाबत कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. या भरधाव वेगाने अनेकांचे बळी घेतले आहेत.