बँकेला फसविल्याप्रकरणी दोघांवर पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:05+5:302021-02-06T04:17:05+5:30
शैला सुरेश भुजबळ, जयश्री शिवाजी धुमाळ, राजेश शिवाजी धुमाळ, सुरेश काशिनाथ भुजबळ (सर्व रा. तळेगाव रोड शिक्रापूर ता. शिरूर), ...
शैला सुरेश भुजबळ, जयश्री शिवाजी धुमाळ, राजेश शिवाजी धुमाळ, सुरेश काशिनाथ भुजबळ (सर्व रा. तळेगाव रोड शिक्रापूर ता. शिरूर), वेंकट एस. चलसानी (रा. इंदिरा सोसायटी, वडगाव शेरी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती व फिर्यादीवरून शिक्रापूर येथील शरद सहकारी बँकेतून सुरेश भुजबळ यांनी व्यवसायाठी २०१३ साली तीन कोटी रुपये कर्ज घेतले होते, यावेळी कर्ज घेताना जामीनदार शैला भुजबळ, जयश्री धुमाळ, राजेश धुमाळ व वेंकट चलसानी यांच्या नावे असलेल्या वेगवेगळ्या जमीन व इमारत बँकेला तारण म्हणून दिले होते, मात्र त्यांनतर भुजबळ यांनी बँकेचे कर्ज हप्ते भरले नसल्याने सर्वांना बँकेकडून पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र तरी देखील बँकेच्या कर्जाचे पैसे भरले नसल्याने जमिनीवर जप्तीचे आदेश देखील काढण्यात आले यावेळी कर्जदार व जामीनदार यांनी बँकेला वेगवेगळ्या स्वरूपाचे चेक देऊन रक्कम भरणार असल्याचे कबुल केले मात्र सदर रक्कम बँकेला भरली नाही, दरम्यान बँकेचे वकील यांनी बँकेला तारण दिलेल्या जमिनीचे सर्च रिपोर्टमध्ये बँकेला तारण दिलेल्या जमिनीची २०१४ व २०१५ मध्ये बँकेची परवानगी न घेता बँकेची फसवणूक करत तारण दिलेली जमीन परस्पर इतर व्यक्तींना विक्री केली असल्याचे समोर आले, दरम्यानच्या काळात सुरेश भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत कर्ज भरणार असल्याचे सांगितले आणि बँकेला कर्जदार व जामीनदार यांच्या नावे दिलेले सर्व चेक बाउंस केले व कर्ज भरलेच नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन बँकेला तारण दिलेली मालमत्ता देखील बँकेच्या परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शरद सहकारी बँकेचे वसुली विभाग प्रमुख राजाराम मारुती डेरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व प्रताप कांबळे हे करत आहेत.