बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:26+5:302021-08-01T04:11:26+5:30
धोंडीभाऊ बबन आरुडे (वय ४० रा.खेड ) संतोष शिवाजी बिरदवडे (वय ४२ रा. खराबवाडी,चाकण) संकेत कुंडलिक मैद (वय२३ रा.चास ...
धोंडीभाऊ बबन आरुडे (वय ४० रा.खेड ) संतोष शिवाजी बिरदवडे (वय ४२ रा. खराबवाडी,चाकण) संकेत कुंडलिक मैद (वय२३ रा.चास ता.आंबेगाव), अभिमन्यू योगेश ढमाले (वय २० रा.कडूस ता.खेड), केतन मारुती शुक्ले, (वय २४ रा.दोंदे ता.खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेलेल्यांची नावे आहेत.
अशी माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या बैलगाडी शर्यत लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अवसरी बुद्रुक येथील बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यत चालू आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस नाईक गणेश डावखर, पोलीस नाईक महेश भालेकर हे अवसरी बुद्रुक परिसरातील बैलगाडा घाट परिसरात गेले.
त्यावेळी त्या ठिकाणी विनापरवाना काही लोक बैलांना बैलगाडीला जुंपून पळवत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिस आल्याचे पाहून अनेक जण तेथून पळून गेले.त्यावेळेस तिथे हजर असणारे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. शर्यती मधून बैलांना यातना, पीडा होईल अशाप्रकारे क्रूरतेने व निर्दयपणे वागून बैलगाडीला जुंपून बैलगाडी सहज चढणीच्या रस्त्याने क्षमतेपेक्षा व ताकदी पेक्षा जास्त पळून बैलांचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिस नाईक महेश भालेकर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास गणेश डावखर करत आहेत.