ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:19+5:302021-08-21T04:14:19+5:30

पुणे : पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असतानादेखील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी मिरवणूक ...

Five persons, including Brahmin Federation president Anand Dave, have been booked | ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Next

पुणे : पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असतानादेखील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी मिरवणूक काढल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जण आणि इतरांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दवेसह मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी आणि मदन सिन्नरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. लालमहाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान पावणेनऊ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 321 व्या जयंतीनिमित्त दवे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यासाठी घोडा आणि वाजंत्री याचा वापर करून मिरवणूक काढण्यात आली. यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील कोणतीही खबरदारी न घेता लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सरडे पुढील तपास करीत आहेत.

------------------------------------------------------------------

Web Title: Five persons, including Brahmin Federation president Anand Dave, have been booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.