धनकवडीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 03:15 PM2021-04-27T15:15:28+5:302021-04-27T15:16:05+5:30

तलाठी यांनाही संस्थेचा चेअरमन आणि सेक्रेटरी आल्याचे भासवले

Five persons, including Ravindra Barhat, have been booked for trying to grab land in Dhankawadi. | धनकवडीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

धनकवडीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसात बारा उताऱ्यावर स्वतःची नावे लावून जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न

पुणे: बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे धनकवडी येथील एकता संस्थेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या रवींद्र बर्‍हाटेसह पाच जणांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता असणार्‍या रवींद्र बर्‍हाटे याच्याविरुद्ध फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याची मालमत्ताही शासनाने जप्त केली आहे.

युवराज सुरेश कोतवाल (रा. लक्ष्मी रोड), विजय मांगिलाल नागोरी (वय ५५, रा. शंकरशेठ रोड), सुबोध त्रिलोकचंद ओसवाल (वय ४४, रा. गुलटेकडी) आणि मॅक ड्रॉप (इंडिया) लि़ शनिवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी चेअरमन राजेंद्र साठे (वय ६५, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. धनकवडी येथील सर्व्हे नं. १० येथील १ हेक्टर ०१ आर ही जमीन संस्थेच्या नावावर असून उच्च न्यायालयानेही साठे हे चेअरमन असल्याचा निकाल दिला आहे. असे असताना एकता सहकारी गृहरचना संस्थेचे शिक्के, लेटरहेड व प्रोसिडिंग बुक यासारखे दस्तऐवज बनावट तयार केले. संस्थेची सभा झाल्याचे भासवून प्रोसिंडिंग बुकमध्ये तशा नोंदी करुन सर्व दस्तऐवज धनकवडी गावकामगार तलाठी यांना सादर केला. त्यात रवींद्र बर्‍हाटे हा संस्थेचा सेक्रेटरी व सुधाकर खवले हा चेअरमन असल्याचे तलाठी यांना खोटे भासवले. त्याद्वारे ७/१२ उतार्‍यावर स्वत:ची नावे लावून संस्थेची जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. सुबोध ओसवाल आणि मॅक ड्रॉप हे संस्थेचे सभासद नसताना संस्थेचे बनावट लेटरहेड व शिक्का बनवून घेऊन त्याचा गैरवापर केला. विजय नागोरी व सुबोध ओसवाल हे चेअरमन व सेक्रेटरी असल्याचे भासवून संस्थेची व सभासदांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Five persons, including Ravindra Barhat, have been booked for trying to grab land in Dhankawadi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.