पाच विद्यार्थ्यांना पालिकेची परदेशात शिक्षणासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:37 AM2018-02-21T06:37:50+5:302018-02-21T06:38:08+5:30
पालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना निधीअंतर्गत निधी उपलब्ध असल्याने शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्ण
पुणे : पालिकेच्या समाज विकास विभागाच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना निधीअंतर्गत निधी उपलब्ध असल्याने शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सन २०१६ मध्ये शहरात दुष्काळग्रस्त भागातून येणाºया विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून काही निधी देण्यात यावा. तसेच पालिकेच्या वतीने १० आर्थिक दुर्बल घटकातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षण घेता यावे म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये स्कॉलरशिप चालू करण्यात यावी व कायमस्वरूपी देण्यात यावी, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
सन २०१७-१८ वर्षांत शहरातील ५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्यासाठी प्रत्येकी २ लाखांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. योजनेचा लाभ देण्यासाठी महपौर, सर्व पक्षनेते, पालिका आयुक्त, अतिरिक्त पालिका आयुक्त, समाज विकास अधिकारी आदी सदस्यांची स्वतंत्र समिती गठीत करण्याचा निर्णयदेखील स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.