पुणे विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 03:59 PM2018-08-01T15:59:44+5:302018-08-01T16:03:16+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा राेवला असून विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांची निवड जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली अाहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच 5 खेळाडूंची निवड भारतीय विद्यापीठ संघात झाली अाहे. के अाय टी विद्यापीठ, भुवनेश्वर यांच्यावतीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील बुद्धिबळ क्रीडा प्रकारासाठी भारतीय विद्यापीठ संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली अाहे. या निवडीमुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला अाहे. विद्यार्थ्यांच्या निवडीची माहिती शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डाॅ. दीपक माने यांनी दिली अाहे.
ही स्पर्धा ब्राझील देशातील अाराकजू या शहरात 12 ते 18 सप्टेंबर 2018 दरम्यान अायाेजित करण्यात अाली अाहे. या स्पर्धेत सहभागी अाठ स्पर्धकांमधील सहा स्पर्धक हे विद्यापीठाचे खेळाडू अाहेत. विद्यापीठाच्या वतीने सहा खेळाडूंना निवड चाचणीसाठी पाठविण्यात अाले हाेते. निवड झालेले खेळाडू व त्यांची महाविद्यालये पुढीलप्रमाणे
1) निखिल दिक्षित, स. प. महाविद्यालय
2) रणवीर माेहिते, बीएमसीसी महाविद्यालय
3) संजना जाेईल, माॅडर्न एज्युकेशन साेसायटी
4) श्रेया अाणेकर, कमिन्य इंजिनिअरिंग काॅलेज
5) ऋजुता देसाई, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालय